Join us

सगळा खर्च सेलिब्रिटी-डीजेवर; यंदाही गोविंदांची घागर मात्र राहिली उताणीच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 06:29 IST

मुंबई, ठाण्यात स्थानिक राजकीय नेत्यांनी हंडीचे आयोजन केले. इव्हेंट्सच्या झगमगाटात गोविंदा पथकांच्या अर्थकारणाचे गणित मात्र बिघडले.

- स्नेहा माेरेमुंबई : थरांची उंची गाठून मुंबईकरांचे मन जिंकण्यासाठी गोविंदा पथकांनी दोन-अडीच महिन्यांपासून कसून सराव केला. सर्वत्र काेट्यवधी रुपये खर्चून दहीहंडीचे आयोजन झाले. मात्र, अनेक थरांची उंची गाठून सलामी देणाऱ्या गोविंदा पथकांना अवघे काही हजार मिळाले. त्यामुळे यंदाही गोविंदा पथकांची घागर उताणीच राहिली.

मुंबई, ठाण्यात स्थानिक राजकीय नेत्यांनी हंडीचे आयोजन केले. इव्हेंट्सच्या झगमगाटात गोविंदा पथकांच्या अर्थकारणाचे गणित मात्र बिघडले. वाहतूक आणि पथकातील खेळाडूंसाठी खाण्या-पिण्याची सोय करावी लागते. यासाठी सुमारे दीड लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र यंदाच्या आयोजनामध्ये काळा चौकी, लालबाग, माझगाव आणि करी रोड येथील आयोजनांंमध्ये अनेक गोविंदा पथकांनी सहा ते सात थरांची सलामी देऊनही अवघ्या दहा-पंधरा हजारांवर भागवावे लागले. 

यंदा गोविंदा पथकांची प्रायोजक शोधण्यासाठी दमछाक झाली. अनेक ठिकाणी थरांची सलामी देऊनही ट्रक, बस, खाण्याचे पैसे न सुटल्याने पथकांमध्ये नाराजी दिसली. गोविंदा पथकांनी बक्षिसांच्या स्वरूपात केवळ पैसे न देता चषक वा सोने-चांदीच्या वस्तूही दिल्या जायच्या. मात्र, याची जागा लाखो रुपयांच्या बक्षिसांनी घेतली आहे. प्रमुख रस्ते, चौक अडवून आयोजकांनी भव्यदिव्य स्टेज उभारले होते. एका स्टेजवर न भागल्याने कॅमेरा, सांस्कृतिक कार्यक्रम, ‘डीजे’साठी चहूबाजूंनी स्टेज बांधून रस्ता अडवल्याचे यावेळी दिसले. 

शहर/जिल्हा     मंडळे     दहीहंड्या     मुंबई     १,३५५     —ठाणे     २१२     २८४     नवी मुंबई      ६५     ५३     रायगड     १५०     २५     पालघर     १५०    ४०    

टॅग्स :दहीहंडी