दहीहंडी मंडळे आणि समितीत ‘असमन्वय’
By Admin | Updated: July 6, 2015 03:01 IST2015-07-06T03:01:20+5:302015-07-06T03:01:20+5:30
गेल्यावर्षी ऐन दहीहंडीच्या तोंडावर न्यायालयाने निर्बंध घातल्याने मंडळांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन निर्णयाला स्थगिती मिळवली होती.

दहीहंडी मंडळे आणि समितीत ‘असमन्वय’
मुंबई : गेल्यावर्षी ऐन दहीहंडीच्या तोंडावर न्यायालयाने निर्बंध घातल्याने मंडळांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन निर्णयाला स्थगिती मिळवली होती. आता तर सर्वोच्च न्यायालयानेही या निर्बंधावर शिक्कामोर्तब केले, मात्र त्यानंतर न्यायालयाने दहीहंडी समन्वय समितीला मार्गदर्शक तत्त्वे तयार करुन वॉर्डनिहाय समित्यांची स्थापन करण्याचे आदेश दिले होते. परंतु, हे आदेश कागदावरच असून याबाबत प्रसिद्ध दहीहंडी उत्सव मंडळे आणि दहीहंडी समन्वय समितीत धुसफूस असल्याचे समोर आले आहे.
दहीहंडीची उंची ३५ फूट करावी व १४ वर्षांवरील मुला-मुलींना यात सहभाग करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी करणारा अर्ज उच्च न्यायालयाने १ जुलै, २०१५ रोजी फेटाळून लावला. त्यामुळे दहीहंडी उत्सवाचे यंदा काय होणार? या चर्चेला पुन्हा उधाण आले. त्यामुळे आता ऐन उत्सवाच्या तोंडावर हा विषय आल्याने मंडळांची कोंडी होत आहे. शहर-उपनगरातील प्रमुख दहीहंडी उत्सव मंडळांनी यापूर्वीच मुलभूत मार्गदर्शक तत्वे तयार केली होती. मात्र त्यांना विश्वासात न घेता समन्वय समितीने वेगळी मार्गदर्शक तत्त्वे आखल्याचेच समितीच्याच अधिकृत सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. (प्रतिनिधी)