Join us

दहिसरमध्ये यंदा पूरग्रस्तांना मदतीची दहीहंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2019 20:10 IST

संस्कार प्रतिष्ठान आयोजित दहिसरच्या मानाच्या दहीहंडीत यावर्षी पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे.

- मनोहर कुंभेजकरमुंबई - संस्कार प्रतिष्ठान आयोजित दहिसरच्या मानाच्या दहीहंडीत यावर्षी पूरग्रस्तांना मदत केली जाणार आहे. दहिसर  स्पोर्टस फाऊंडेशन येथे शनिवार 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमास पूरग्रस्त भागातील बेघर झालेले कुटुंबीय उपस्थित राहणार आहे. सांगली, कोल्हापूर भागातील पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उघड्यावर आले. त्यांना मदतीचा हात म्हणून शिवसेना उपनेते, म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांच्या हस्ते या भागातील कुटुंबीयांना मदत केली जाणार आहे. 

सांगली पलूस येथील सुरेखा शहाजी सूर्यवंशी यांचे राहते घर पाण्यात वाहून गेले परिस्थितीअभावी त्यांच्या मुलीचे शिक्षण थांबले आहे, तर कोल्हापुरातील सत्यप्पा अत वाडकर, राजू कोरी देखील बेघर झाले आहेत, त्यांचे पुनर्वसन प्रतिष्ठान करणार आहे. प्रतिष्ठानचे यंदाचे 13 वे  वर्ष असून विविध सामाजिक उपक्रम मंडळातर्फे राबवले जातात. याप्रसंगी विभाग प्रमुख,आमदार विलास पोतनीस, महिला आघाडी संघटक सुजाता शिंगाडे, उपविभाग संघटक शकुंतला शेलार, भालचंद्र म्हात्रे कार्यक्रमाचे आयोजक नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, मुंबै बँक संचालक अभिषेक घोसाळकर उपस्थित राहणार आहेत.

टॅग्स :दहीहंडी