दहीहंडी उत्सव : विम्यामध्ये दुप्पटीने वाढ  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 03:34 IST2017-08-10T03:34:46+5:302017-08-10T03:34:46+5:30

गोविंदांच्या अपघात विम्यात विमा कंपनीने बदल करत, जखमी गोविंदांना ५० हजार रुपयांवरून १ लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे.

Dahihandi Celebration: There is a double increase in insurance | दहीहंडी उत्सव : विम्यामध्ये दुप्पटीने वाढ  

दहीहंडी उत्सव : विम्यामध्ये दुप्पटीने वाढ  

मुंबई : गोविंदांच्या अपघात विम्यात विमा कंपनीने बदल करत, जखमी गोविंदांना ५० हजार रुपयांवरून १ लाख रुपयांपर्यंत वाढ केली आहे. या आधी जखमी गोविंदांना ५० हजार रुपये रुग्णालयीन खर्चाची तरतूद होती. मात्र, दहीहंडी समन्वय समितीने ती वाढविण्याची मागणी केल्यानंतर, विमा कंपनीनेही त्याला हिरवा कंदील दाखविला आहे. मंगळवारी या संदर्भातील विमा कंपनी आणि दहीहंडी समन्वय समितीमध्ये झालेल्या बैठकीनंतर, ही वाढ मिळाल्याचे समितीने स्पष्ट केले.

Web Title: Dahihandi Celebration: There is a double increase in insurance