डहाणूत भूमिगत वीजवाहिनी जळली

By Admin | Updated: June 14, 2014 23:44 IST2014-06-14T23:44:26+5:302014-06-14T23:44:26+5:30

वडकून सब स्टेशनला वीजपुरवठा करणारी भूमिगत वाहिनी डहाणू रेल्वे पुलानजीक शुक्रवारी मध्यरात्री जळली. दरम्यान, किनाऱ्यालगत गावांचा वीजपुरवठा खंडीत झाली.

Dahanu lost underground electricity vault | डहाणूत भूमिगत वीजवाहिनी जळली

डहाणूत भूमिगत वीजवाहिनी जळली

बोर्डी : वडकून सब स्टेशनला वीजपुरवठा करणारी भूमिगत वाहिनी डहाणू रेल्वे पुलानजीक शुक्रवारी मध्यरात्री जळली. दरम्यान, किनाऱ्यालगत गावांचा वीजपुरवठा खंडीत झाली.
महावितरणच्या डहाणू विभागांतर्गत डहाणू सबस्टेशनहून वडकून सब स्टेशनकडे येणारी भूमिगत वीजवाहिनी शुक्रवारी मध्यरात्री रेल्वे पुलानजीक जळल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. शनिवारी संध्याकाळपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत झाला नव्हता. मागील आठवड्यापासून डहाणूतील वातावरणात उष्मा व आर्द्रतेचे प्रमाण कमालीचे वाढले आहे. मध्यरात्री वीज खंडीत झाल्याने किनाऱ्यालगत गावातील नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला. दिवसभर वीज नसल्याने पाणी उपसणारे वीज मोटार पंप बंद होते. (वार्ताहर)

Web Title: Dahanu lost underground electricity vault