डहाणू नगराध्यक्ष रमिला पाटील , तर उपनगराध्यक्ष चाफेकर
By Admin | Updated: June 15, 2015 23:39 IST2015-06-15T23:39:44+5:302015-06-15T23:39:44+5:30
नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रमिला मनोज पाटील नगराध्यक्ष तर, प्र्रदीप चाफेकर

डहाणू नगराध्यक्ष रमिला पाटील , तर उपनगराध्यक्ष चाफेकर
डहाणू : नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्षपदासाठी सोमवारी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रमिला मनोज पाटील नगराध्यक्ष तर, प्र्रदीप चाफेकर यांची उपनगराध्यक्षपदी अविरोध निवड करण्यात आली.
नगराध्यक्ष मिहिर शहा यांचा अडीच वर्षाचा कार्यकाळ २४ जून रोजी संपत असल्याने पुढील अडीच वर्षांसाठी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. नगराध्यक्ष पदासाठी रमिला पाटील आणि उपनगराध्यक्ष पदासाठी प्रदीप चाफेकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले होते. त्यांच्या विरोधात कुणीही अर्ज भरला नसल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा उपविभागीय अधिकारी तथा पिठासीन अधिकारी अंजली भोसले यांनी केली. (वार्ताहर)