डॅडीचा शार्पशूटर २३ वर्षांनी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 05:45 AM2018-07-21T05:45:58+5:302018-07-21T05:46:00+5:30

भांडुपमधील सेना शाखाप्रमुखाच्या हत्येसह, ठाणे नवी मुंबईत हत्या, हत्येचा प्रयत्नाप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या डॉन अरुण गवळीचा शार्पशूटरला २३ वर्षांनी बदलापूर येथून गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत.

Daddy's sharpshooter goes after 23 years | डॅडीचा शार्पशूटर २३ वर्षांनी गजाआड

डॅडीचा शार्पशूटर २३ वर्षांनी गजाआड

Next

मुंबई : भांडुपमधील सेना शाखाप्रमुखाच्या हत्येसह, ठाणे नवी मुंबईत हत्या, हत्येचा प्रयत्नाप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या डॉन अरुण गवळीचा शार्पशूटरला २३ वर्षांनी बदलापूर येथून गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. सुरेश उपाध्याय (४६) असे त्याचे नाव असून जामीन मिळाल्यानंतर तो पसार झाला होता. नव्वदच्या दशकात गवळीसोबत उपाध्याय कार्यरत होता. त्याने भांडुपमधील शिवसेना शाखाप्रमुख मारुती हळदणकर यांच्या घरावर गोळीबार करत त्यांची निघृण हत्या केली. १९९२ मध्ये उल्हासनगरमध्ये भरदिवसा व्यापाऱ्याची हत्या केली. १९९५ मध्ये पूर्ववैमनस्यातून भांडुप टॅक रोड सुरेश नावाच्या इसमाची हत्या केली. या गुन्ह्यांत तो जामिनावर बाहेर पडला तो पसार झाला.त्यानंतर तो लपून बसला होता. तो बदलापूर येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ७ ला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि उपाध्यायला बेड्या ठोकल्या.

Web Title: Daddy's sharpshooter goes after 23 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.