Join us  

महाराष्ट्रात दादर नामांतर परिषद घेणार - भीम आर्मीचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2024 9:40 PM

श्रीकांत जाधव / मुंबई :गेल्या कित्येक वर्षांपासून फुले-शाहू आंबेडकरी समाजाकडून पश्चिम उपनगरातील दादर रेल्वे स्टेशनला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर ...

श्रीकांत जाधव / मुंबई :गेल्या कित्येक वर्षांपासून फुले-शाहू आंबेडकरी समाजाकडून पश्चिम उपनगरातील दादर रेल्वे स्टेशनला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी केली जात आहे. ही मागणी पूर्ण करून दादरचे नामांतर करण्याचे प्रस्तावित होते. मात्र, परेल रेल्वे स्थानक टर्मिनसचा मुद्दा पुढे करून आंबेडकरी जनतेची फसवणूक केली जात असल्याने त्या विरोधात महाराष्ट्रात दादर नामांतर परिषद घेत तीव्र विरोध केला जाईल असा इशारा भीम आर्मीचे राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांनी दिला आहे.

दादर रेल्वे स्टेशनला डॉ. बाबासाहेब आंबेडकर याचे नाव मिळावे म्हणून संघर्ष सुरु आहे. अनेक आंबेडकरी संघटनांनी यासाठी आंदोलन, मागणी केली आहे. त्यावर सरकारने दादरला बाबासाहेबांचे नाव देऊ असे आश्वासन दिले होते. मात्र खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्र्यांना आठ रेल्वे स्टेशनचे प्रस्ताव दिले आहेत. त्याच्यामध्ये डॉ. आंबेडकरांच्या नावाचा दादर रेल्वे स्टेशनचा उल्लेख नाही.

ही महाराष्ट्रातल्या जनतेची फसवणूक आहे.  फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीची फसवणूक आहे. त्यामुळे कितीही संघर्ष आणि कितीही आंदोलन करावे लागले तरी आम्ही दादर नामांतरासाठी संघर्ष आंदोलने करतच राहणार  आहे. यासाठी लवकरच दादर नामांतर परिषद घेत दादर नामांतराचा हा लढा आम्ही अधीक तीव्र करू असा इशारा भीम आर्मीने दिला आहे.

टॅग्स :दादर स्थानकमुंबई