Join us

आरोपींच्या सुटकेविरोधात दाभोलकर कुटुंबीय कोर्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 05:25 IST

न्यायालयाने २३ सप्टेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी ठेवली.

मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील तीन आरोपींना निर्दोष सोडण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला दाभोलकर कुटुंबीयांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.  न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर बुधवारी सुनावणी सुरू होती. न्यायालयाने सर्व आरोपींना आणि सीबीआयला नोटीस बजावली. न्यायालयाने २३ सप्टेंबर रोजी या याचिकेवर सुनावणी ठेवली.

नरेंद्र दाभोलकर यांच्या कन्या मुक्ता दाभोलकर यांनी दोषी ठरविण्यात आलेल्या दोघांना यूएपीए व हत्येचा कट रचल्याच्या गुन्ह्यातून निर्दोष करण्याच्या निर्णयाला मुक्ता दाभोलकर यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. माझ्या वडिलांची हत्या ही सुनियोजित हत्या होती आणि हा मोठा कट होता, असे मुक्ता यांनी ॲड. अभय नेवगी यांच्याद्वारे दाखल अपिलात म्हटले आहे. 

टॅग्स :नरेंद्र दाभोलकरन्यायालय