डबेवाल्यांची आज ‘मतदान दिंडी’

By Admin | Updated: February 17, 2017 02:31 IST2017-02-17T02:31:00+5:302017-02-17T02:31:00+5:30

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, म्हणून मुंबईचे डबेवाले शुक्रवारी, १८ फेब्रुवारीला सायंकाळी

Dabewal's 'Votting Dindi' today | डबेवाल्यांची आज ‘मतदान दिंडी’

डबेवाल्यांची आज ‘मतदान दिंडी’

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी, म्हणून मुंबईचे डबेवाले शुक्रवारी, १८ फेब्रुवारीला सायंकाळी ६ वाजता चर्चगेट रेल्वे स्थानकाजवळ ‘मतदान दिंडी’ काढणार आहेत. मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही दिंडी काढत असल्याचे मुंबई डबेवाला असोसिएशनने सांगितले.
असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर म्हणाले की, मतदारांमध्ये जागरूकता यावी, म्हणून मुंबई मनपा विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नांना मदत म्हणून मुंबईचे डबेवाले मतदान दिंडी काढणार आहेत. दिंडीच्या माध्यमातून डबेवाले मुंबईकरांना मतदान करण्याचे आवाहन करतील. सध्या मुंबईसारख्या मेट्रो सिटीमध्ये सुशिक्षित समाज मतदानाबाबत उदासीन दिसत आहे. त्यामुळे शहरात हाकेच्या अंतरावर मतदान केंद्र असतानाही, मतदानाचा टक्का घसरतो आहे. तो वाढवण्यासाठी डबेवाले संघटनेचे अध्यक्ष भाऊसाहेब करवंदे व उल्हास मुके, सोपान मरे, बबन वाळंज यांच्या नेतृत्वाखाली डबेवाल्यांनी दिंडी काढण्याचा निर्णय घेतला आहे.
डबेवाल्यांसाठी ही दिंडी म्हणजे एक मोहीम असून त्यामुळे लोकशाही बळकट होण्यास मदत होईल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. महापालिका आयुक्त अजय मेहता आणि अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांच्यासह निवडणूक निरीक्षक सत्यवान मेस्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी निघणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dabewal's 'Votting Dindi' today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.