मुंबईतील डबेवाल्यांचा शिवसेनेला पाठिंबा
By Admin | Updated: January 23, 2017 16:21 IST2017-01-23T16:19:20+5:302017-01-23T16:21:18+5:30
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी मात्र शिवसेनेच्या पाठिशी रहाण्याचा निर्णय घेतला

मुंबईतील डबेवाल्यांचा शिवसेनेला पाठिंबा
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुंबईच्या डबेवाल्यांनी मात्र शिवसेनेच्या पाठिशी रहाण्याचा निर्णय घेतला आहे, डबेवाल्यांच्या संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी ही माहिती दिली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मुंबईत भव्य डबेवाला भवन बांधण्यात येईल असे वचन दिले होते. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेने डबेवाला भवन बांधण्यासाठी १ कोटी रुपयांची तरतुद केली. डबेवाला भवन साठी जागेची पहाणी चालू आहे. तसेच डबेवाल्यांन साठी रेल्वे स्टेशनच्या बाहेर मोफत सायकल स्टॅन्ड बांधण्यात येतील, असे आश्वासन मा. उध्दव ठाकरे साहेबांनी डबेवाल्यांना दिले होते त्या नुसार रेल्वे स्टेशनच्या बाहेर सायकल स्टॅन्ड बांधण्याचे काम चालू झाले आहे. चर्निरोड,ग्रॅटरोड,अंधेरी स्टेशनच्या बाहेरील सायकल स्टॅन्ड बांधुन झालेत.ईतर स्टेशन बाहेरील काम प्रगती पथावर आहे. शिवसेना आणी शिवसेना नेते डबेवाल्यांच्या अडचणीच्या काळात डबेवाल्यांच्या सोबत रहातात. म्हणुन मुंबईच्या डबेवाल्यांनी शिवसेने सोबत रहाण्याचा निर्णय घेतला, असे डबेवाला संघटनेच्य तळेकर यांनी सांगितले.