Join us  

'यांची' मुले विमानातून फिरतील, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 11:15 AM

चांगले काम करणाऱ्याला ईश्वर नेहमी मदत करीत असतो.

मुंबई : मुंबईतील सर्व डबेवाले मेहनत करून लोकांना जेवण पोहोचविण्याचे पुण्यकर्म करीत आहेत. चांगले काम करणाऱ्याला ईश्वर नेहमी मदत करीत असतो. आज डबेवाले सायकलवरून फिरत असले तरीही त्यांची मुले शिक्षणाच्या माध्यमातून स्वकर्तृत्वावर प्रगती करून मोटारकार आणि विमानाने फिरतील, असा विश्वास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी व्यक्त केला.

राज्यपालांच्या हस्ते मुंबईतील निवडक डबेवाल्यांना राजभवन येथे सायकल वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. श्री साई श्रद्धा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात १२ डबेवाल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात सायकलच्या चाव्या देण्यात आल्या.  शुभ्रांशु दीक्षित यांनी प्रतिष्ठानतर्फे कोरोना काळात केलेल्या समाजोपयोगी उपक्रमांची माहिती दिली.  यावेळी मुंबई डबावाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर उपस्थित होते. 

टॅग्स :भगत सिंह कोश्यारीमुंबईसरकार