डी गँगचा हस्तक आरिफ भुजवालाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:29 IST2021-02-05T04:29:54+5:302021-02-05T04:29:54+5:30

अंडर वर्ल्ड ड्रग्ज कनेक्शन : एनसीबीने रायगडमधून घेतले ताब्यात लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबई महानगर व परिसरातील अमली ...

D gang's mastermind Arif Bhujwala arrested | डी गँगचा हस्तक आरिफ भुजवालाला अटक

डी गँगचा हस्तक आरिफ भुजवालाला अटक

अंडर वर्ल्ड ड्रग्ज कनेक्शन : एनसीबीने रायगडमधून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई महानगर व परिसरातील अमली पदार्थांच्या तस्करीचा अंडरवर्ल्डमधील मुख्य सूत्रधार व डी गँगचा हस्तक आरिफ भुजवाला याला अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) सोमवारी अटक केली.

डोंगरीतील कारवाईवेळी फरार झालेल्या भुजवाला हा रायगडमध्ये एके ठिकाणी लपून बसला असता त्याला अटक करण्यात आली. त्याच्यावरील कारवाईमुळे दुबईतून आयात होत असलेल्या ड्रग्ज नेटवर्कचा पर्दाफाश होण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली.

एनसीबीच्या पथकाने गेल्या आठवड्यात चिकू पठाणला अटक केली. त्याच्या चौकशीत आरिफ भुजवाला आणि त्याच्या ड्रग्ज फॅक्टरीची माहिती समोर आली. त्यानंतर भुजवालाच्या डोंगरीतील नूर मंझिलमधील फ्लॅटवर छापा टाकून दोन कोटींच्या रोकडीसह मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा, कच्चा माल जप्त करण्यात आला. तेव्हा भुजवाला खिडकीतून उडी मारून फरार झाला होता.

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या ड्रग्ज तस्करीची सूत्रे तोच सांभाळत होता. त्यामुळे त्याला पकडण्यासाठी एनसीबीकडून अनेक ठिकाणी छापेमारी सुरू होती. तो रायगडमध्ये लपल्याची माहिती समोर आल्यानंतर पथकाने शनिवारपासून तेथे शोधमोहीम हाती घेतली. सोमवारी सकाळी त्याला अटक करण्यात आली.

दाऊदच्या नेटवर्कमधील महत्त्वाचा दुवा असलेल्या भुजवालाच्या ड्रग्जचे जाळे परदेशापर्यंत आहे. त्यामुळे त्याच्या अटकेमुळे डी गँगशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण धागेदोरे हाती लागण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.

.......................

Web Title: D gang's mastermind Arif Bhujwala arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.