बुलेट ट्रेनसाठी वृक्षांची कत्तल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:07 IST2021-09-15T04:07:03+5:302021-09-15T04:07:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई - ठाणे महापालिकेमार्फत बुलेट ट्रेनसाठी दिवा येथे भूखंड मिळणार आहे. त्यामुळे वांद्रे - कुर्ला संकुलातील ...

Cutting down trees for a bullet train? | बुलेट ट्रेनसाठी वृक्षांची कत्तल?

बुलेट ट्रेनसाठी वृक्षांची कत्तल?

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई - ठाणे महापालिकेमार्फत बुलेट ट्रेनसाठी दिवा येथे भूखंड मिळणार आहे. त्यामुळे वांद्रे - कुर्ला संकुलातील प्रस्तावित स्थानकासाठी वृक्ष तोडण्याची परवानगी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने मागितली आहे; मात्र पालिका प्रशासनाने यावर सूचना व हरकती मागवल्या आहेत. याप्रकरणी बुधवारी सुनावणी होणार आहे.

अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. काही दिवसांपूर्वी ठाणे महापालिकेच्या महासभेने बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी दिवा येथील भूखंड देण्याची तयारी दाखवली. तर आता मुंबईतील स्थानकांकरिता वृक्ष तोडण्याची प्रशासकीय परवानगी मिळण्याचा प्रस्ताव महापालिकेकडे सादर करण्यात आला आहे; मात्र राज्यातील महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी या प्रस्तावाला विरोध दर्शविला आहे.

हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनने सादर केलेल्या प्रस्तावानुसार ११ वृक्ष तोडण्याबरोबरच १४१ वृक्ष पुनर्राेपित करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. याबाबत प्रशासनाकडून मागविण्यात आलेल्या सूचना व हरकती सादर करण्यास बुधवारपर्यंतची मुदत आहे. त्यांनतर दुपारी २.३० ते ३ या वेळात भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयातील उद्यान विभागाच्या कार्यालयात सुनावणी होईल. अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरणाच्या पटलावर मांडण्यात येणार आहे.

मेट्रोसाठी १३९ वृक्षांची कत्तल

मेट्रो रेल्वेच्या अंधेरी ते विमानतळ या सात अ टप्प्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरातील १३९ वृक्ष तोडली जाणार आहेत. यापैकी ५५ वृक्ष तोडण्याची आणि ८४ वृक्ष पुनर्राेपित करण्याची परवानगी पालिकेकडे मागितली आहे. यावरही सुनावणी होणार आहे.

Web Title: Cutting down trees for a bullet train?