झिरो परसेन्टच्या मोहात ग्राहक

By Admin | Updated: October 22, 2014 00:23 IST2014-10-22T00:23:46+5:302014-10-22T00:23:46+5:30

गार झालेला असो अथवा नसो, बोनस मिळालेला असो अथवा नसो या जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठात चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी जबरदस्त धूम उडाली आहे.

Customers interested in Zero Percent | झिरो परसेन्टच्या मोहात ग्राहक

झिरो परसेन्टच्या मोहात ग्राहक

पालघर/वसई/विरार : पगार झालेला असो अथवा नसो, बोनस मिळालेला असो अथवा नसो या जिल्ह्यातील सर्वच बाजारपेठात चैनीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी जबरदस्त धूम उडाली आहे. याचे कारण झिरो परसेंट इन्टरेस्टवर वस्तू खरेदी करा ही योजना आहे. बिनव्याजी स्वरुपात कर्ज मिळणार व ते वापरून वस्तूची खरेदी करता येणार वस्तू वापरायला आज मिळणार परतफेड मात्र बारा ते सोळा सुलभ हप्त्यांत करावी लागणार अशी ही स्कीम ग्राहकांना आपल्या मोहजालात खेचते आहे. परंतु यातून ग्राहकांची दिशाभूल होते आहे. कारण प्रारंभीचे चार हप्ते एकदम डाऊन पेमेंट म्हणून वसूल करायचे व उर्वरित रकमेवरील व्याज डॉक्युमेंटेशन अ‍ॅण्ड प्रोसेसिंग चार्ज, लिगल चार्ज अशा वेगवेगळ्या नावाखाली सुरूवातीलाच वसूल करायचे अशी ही योजना असते. म्हणजे व्याज भरावे लागतेच. फक्त ते इतर कर्जांवर जसे परतफेडीच्या वेळी हप्त्यांत भरावे लागते तसे न होता व्याजाची रक्कम आधीच वसूल करून घेतली जाते तीही वेगळ्या हेडखाली. म्हणूनच तिला झिरो परसेंट इन्टरेस्ट स्कीम असे म्हटले जाते. जर इन्टरेस्ट वसूलच होत नाही तर मग योजनेत झिरो परसेंटची गरज काय असा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हा त्याचे उत्तर देताना हा खुलासा झाला. की सर्व व्याज वसूल होते परंतु ते खरेदीच्या वेळी व परतफेडीचे हप्ते केवळ मुद्दलाचे असतात म्हणून झिरो परसेंट इन्टरेस्ट असा फसवा उल्लेख केला जातो. व त्याला ग्राहकही भुलतात.

Web Title: Customers interested in Zero Percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.