कस्टमची इमारत धोकादायक
By Admin | Updated: August 12, 2014 00:24 IST2014-08-11T23:36:29+5:302014-08-12T00:24:06+5:30
सातपाटीमधील केंद्रीय सीमाशुल्क (कस्टम) विभागाची दोन मजली इमारत धोकादायक अवस्थेत उभी आहे. अधिकारी - कर्मचारी वर्गाने कस्टम कार्यालयात हलवून आपली सुटका करुन घेतली असली

कस्टमची इमारत धोकादायक
हितेन नाईक, पालघर
सातपाटीमधील केंद्रीय सीमाशुल्क (कस्टम) विभागाची दोन मजली इमारत धोकादायक अवस्थेत उभी आहे. अधिकारी - कर्मचारी वर्गाने कस्टम कार्यालयात हलवून आपली सुटका करुन घेतली असली तरी इमारतीच्या सभोवताली रहाणाऱ्या कुटुंबांना मात्र रोज मृत्यूशी सामना करावा लागत आहे.
सातपाटी, मुरबे, वडराई येथील मच्छिमारांना समुद्रात मासेमारीला जाण्याआधी खलाशाची ओळखपत्रे, व्हीआरसी, रहिवासी दाखले, संस्थेचे पत्र इत्यादी कागदपत्रे सातपाटीच्या सीमाशुल्क विभागाकडे जमा करावी लागतात. त्यानंतरच संबंधित कागदपत्रांची शहानिशा करुनच मच्छिमारांना मासेमारीचे परवाने दिले जातात.
दहशतवाद्यांचा समुद्रमार्गाने असणारा धोका पहाता या कस्टम विभागाकडे मोठी जबाबदारी असल्याने पालघरमधील २८ कि.मी. किनारपट्टीवरील संशयास्पद हालचालीकडे लक्ष ठेवण्याची जबाबदारी या कस्टम विभागाकडे होती.