कर्फ्यूदरम्यान जमावाला बंदी, संचाराला नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:07 IST2020-12-24T04:07:32+5:302020-12-24T04:07:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईत नाइट कर्फ्यूदरम्यान पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई असून, संचाराला बंदी नसल्याचे कायदा ...

Curfew banned during curfew | कर्फ्यूदरम्यान जमावाला बंदी, संचाराला नाही!

कर्फ्यूदरम्यान जमावाला बंदी, संचाराला नाही!

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईत नाइट कर्फ्यूदरम्यान पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई असून, संचाराला बंदी नसल्याचे कायदा व सुव्यवस्थेचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले. यादरम्यान नागरिक त्यांच्या कामानिमित्त बाहेर पडू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाल्याने, मुंबई पोलिसांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले. पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्फ्यू आपल्या सुरक्षिततेसाठी आणि आरोग्यासाठी आहे. यात रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावावर निर्बंध आहेत. नाइट शिफ्टमधील सर्व व्यवसाय, करमणुकीशी संबंधित पब, रेस्टॉरंट्स, थिएटर ११ वाजता बंद करणे सक्तीचे आहे. त्याव्यतिरिक्त अन्य व्यवसायाला तसेच सर्व अत्यावश्यक सेवांना परवानगी आहे. नागरिक दुचाकी आणि चार चाकी वाहनांतून प्रवास करू शकतात. मात्र कारमध्ये चारपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही. आपण कर्फ्यूच्या वेळी फिरायला जाऊ शकता किंवा गाडी चालवू शकता. फक्त पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. यादरम्यान नागरिकांनी मास्कचा वापर करीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असेही त्यांनी नमूद केले.

बुधवारी या जमावबंदी आदेशाचे परिपत्रकही पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे. तसेच या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

..........................

Web Title: Curfew banned during curfew