विदु्रपीकरण करणा-यांवर बसणार अंकुश

By Admin | Updated: November 10, 2014 00:39 IST2014-11-10T00:39:48+5:302014-11-10T00:39:48+5:30

जिल्हास्तरावर विशेष नोडल अधिकारी यांची नियुक्ती केल्याने आता शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे

The curb is going on for insanity makers | विदु्रपीकरण करणा-यांवर बसणार अंकुश

विदु्रपीकरण करणा-यांवर बसणार अंकुश

ठाणे : ठाणे ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत शहराचे पोस्टर्स, होर्डिंग्ज, बॅनर लावून केल्या जाणा-या विद्रुपीकरणाला आळा घालण्यासाठी तसेच न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हा समन्वयक अधिकारी म्हणून प्रशांत कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कदम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तीन ठिकाणी याबाबतचे गुन्हे दाखल केले
आहेत.
जिल्हास्तरावर विशेष नोडल अधिकारी यांची नियुक्ती केल्याने आता शहराचे विद्रुपीकरण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यानुसार, आता त्यांनी तीन ठिकाणी गुन्हे दाखल केले आहेत. यात मीरा रोड येथे एक आणि भार्इंदर येथे दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय, नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, होर्डिंग्ज आणि पोस्टर्स लावताना स्थानिक स्वराज्य संस्थांची परवानगी घेऊन लावण्यात यावे, अन्यथा गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करण्याचा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The curb is going on for insanity makers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.