काशी आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नाते - दयाशंकर मिश्रा
By मनोहर कुंभेजकर | Updated: May 3, 2025 20:16 IST2025-05-03T20:15:56+5:302025-05-03T20:16:28+5:30
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी उत्तर भारतीयंशी साधला संवाद साधला.

काशी आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक नाते - दयाशंकर मिश्रा
मुंबई-महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथे आयोजित कार्यक्रमात, उत्तर प्रदेशचे आयुष मंत्री दयाशंकर मिश्रा 'दयाळू' यांनी उत्तर भारतीय समाजाच्या प्रतिनिधींशी संवाद साधला, त्यांच्या चिंता ऐकल्या आणि आत्मविश्वासाचा एक नवीन किरण पेटवला. महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई भाजपचे उपाध्यक्ष अमरजीत मिश्रा यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात उत्तर प्रदेशचे मंत्री बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मंत्री मिश्रा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे आणि काशी येथे जन्मलेल्या राणी लक्ष्मीबाईंच्या अदम्य धैर्याचे स्मरण करत सांगितले की, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राचे नाते केवळ भौगोलिकच नाही तर भावनिक आणि ऐतिहासिक आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या भूमीने छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा असलेल्या लाखो उत्तर भारतीयांना रोजगार, आदर आणि ओळख दिली आहे.
कार्यक्रमाचे निमंत्रक व भाजप नेते अमरजीत मिश्रा म्हणाले की, महाराष्ट्र दिनानिमित्त काशीहून आलेल्या उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या एक भारत श्रेष्ठ भारत या संकल्पनेचे उत्कृष्ट उदाहरण सादर केले.
यावेळी आरडी यादव, अनिल कनौजिया, रमाकांत गुप्ता, लाल बहादूर यादव, प्रदेश भाजप प्रवक्ते शैलेश पांडे, राकेश सिंह, संतोष दीक्षित, विनय दुबे इत्यादींसह मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.