सीएसटी पुलावर स्मशानशांतता

By Admin | Updated: September 4, 2014 02:41 IST2014-09-04T02:41:19+5:302014-09-04T02:41:19+5:30

सीएसटीवरील सर्वात लांबीच्या अशा पादचारी पुलाचे मोठय़ा थाटामाटात मध्य रेल्वे प्रशासनाकडून उद्घाटन करण्यात आले.

CST bridge crematorium | सीएसटी पुलावर स्मशानशांतता

सीएसटी पुलावर स्मशानशांतता

मुंबई : सीएसटीवरील सर्वात लांबीच्या अशा पादचारी पुलाचे मोठय़ा थाटामाटात मध्य रेल्वे प्रशासनाकडून उद्घाटन करण्यात आले. मात्र हा पादचारी पूल सुरू झाल्यानंतरही प्रवाशांच्या प्रतीक्षेत आहे. या पुलाचा कमी प्रमाणात प्रवाशांकडून वापर केला जात असून कोटय़वधी पाण्यात तर गेले नाहीना, असा विचार आता मध्य रेल्वेच्या अधिका:यांना सतावू लागला. 
सीएसटी स्थानकात एक ते सात प्लॅटफॉर्म हे उपनगरीय लोकलसाठी आहेत. तर आठ ते अठरार्पयतचे प्लॅटफॉर्म हे लांब पल्ल्याच्या गाडय़ांसाठी आहेत. हे पाहता या स्थानकावर मोठय़ा संख्येने प्रवाशांची ये-जा असते. सीएसटी स्थानकात एखादी लोकल आल्यास कल्याणच्या दिशेने असणा:या जुन्या पुलाचा वापर करून स्थानकाबाहेर पडणा:या प्रवाशांची संख्या अधिक आहे. अनेक जण पश्चिम दिशेला असणा:या जे.जे. फ्लायओव्हरकडे जाण्यासाठी जुन्या पुलाचाच अधिक वापर करतात. महत्त्वाची बाब म्हणजे पूर्वेला असणा:या पी. डिमेलो रोडकडे जाण्यासाठी तर प्रवाशांना पूर्ण सीएसटी स्थानकाला वळसा घालून जावे लागत होते. या सर्व बाबी पाहता मध्य रेल्वेने अठरा प्लॅटफॉर्मला जोडणारा सर्वात मोठा असा पादचारी पूल बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी साडेआठ कोटींची तरतूद मध्य रेल्वेने केली. सध्याच्या 94 मीटर जुन्या पादचारी पुलाला नवीन असलेला 270 मीटर लांबीचा पूल जोडला. सर्वात लांबीच्या असलेल्या या पादचारी पुलाचे 18 ऑगस्ट रोजी मध्य रेल्वेकडून उद्घाटन करत प्रवाशांसाठी खुला करण्यात आला. मात्र या पुलाचा वापर अत्यंत कमी प्रमाणात प्रवाशांकडून केला जात असल्याचे दिसते. एखाददुसरा प्रवासी यावरून जाताना दिसतो. या पुलाचा वापर फक्त मेल-एक्स्प्रेस तिकीट काढलेले प्रवासीच करू शकतात, असे फलक लावून नमूद केल्याने त्याचा लोकल प्रवाशांकडून वापर केला जात नाही. त्यामुळे या पुलाचा वापर फक्त मेल-एक्स्प्रेस प्रवाशांसाठीच असल्याने हे प्रवासी फिरकत नाहीत. त्यामुळे या पुलावर स्मशानशांतताच असल्याचे  दिसते. (प्रतिनिधी)
 
या नव्या पादचारी पुलाचा वापर प्रवाशांकडून हळूहळू केला जाईल. गर्दीच्या वेळेत ब:यापैकी प्रवाशांकडून त्याचा वापर केला जात आहे. या पुलाचा प्रवाशांनी जास्तीत जास्त वापर करावा म्हणून आम्ही या पुलाच्या दोन्ही बाजूला फलकही लावलेले आहेत.    - ए.के. सिंह (मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी)
 
या पुलावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. यासाठी रेल्वेकडून पुलाचा सव्र्हे करण्यात येईल आणि मगच सीसीटीव्ही बसवण्यात येतील. 
- आलोक बोहरा (वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, मध्य रेल्वे) 
 
एटीव्हीएम बसवणार
या नवीन पादचारी पुलाचा प्रवाशांकडून अत्यंत कमी वापर केला जात असतानाच मध्य रेल्वेकडून या पुलावर एटीव्हीएम मशिन बसवण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ही मशिन लवकरच बसवली जाणार आहे. 

 

Web Title: CST bridge crematorium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.