Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘सीएसएसडी’ रोखणार रुग्णालयातील संसर्ग; कामा रुग्णालयात लवकरच सुरू होणार विशेष विभाग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 06:19 IST

सीएसएसडी विभाग सुरू करण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च येणार असून, अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह हा विभाग उभारण्यात आला आहे

मुंबई - रुग्णांना उपचारादरम्यान होणाऱ्या संसर्गामुळे म्हणजे हॉस्पिटल-अक्वायर्ड इन्फेक्शनमुळे रुग्णांचा रुग्णालयात राहण्याचा कालावधी वाढतो; तसेच उपचारांचा खर्च वाढतो तर काही वेळा रुग्णांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन महत्त्वाच्या मातृ व बालरोग रुग्णालयांपैकी एक असलेल्या कामा रुग्णालयात लवकरच सेंट्रल स्टेराइल सप्लाय डिपार्टमेंट (सीएसएसडी) सुरू करण्यात येणार आहे. 

सीएसएसडी विभाग सुरू करण्यासाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च येणार असून, अत्याधुनिक यंत्रसामग्रीसह हा विभाग उभारण्यात आला आहे. या विभागामुळे रुग्णालयात वापरण्यात येणारी सर्व शस्त्रक्रिया उपकरणे, वैद्यकीय साहित्य आणि इतर साधनसामग्री यांचे निर्जंतुकीकरण शास्त्रशुद्ध आणि नियंत्रित पद्धतीने केले जाणार आहे. निर्जंतुकीकरणापासून ते साठवणूक आणि वितरणापर्यंतची संपूर्ण प्रक्रिया या एकाच विभागातून होणार आहे. 

का आहे गरज?रुग्णालयीन संसर्ग झाल्यास डॉक्टरांना मूळ आजारावर उपचार करण्याऐवजी संसर्गावर स्वतंत्रपणे उपचार करावे लागतात. यामुळे रुग्णालयातील बेड्स अधिक काळ व्यापले जातात आणि आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण येतो. अनेक खासगी रुग्णालयांमध्ये अशा संसर्गाला आळा घालण्यासाठी स्वतंत्र समित्या आणि तज्ज्ञ कार्यरत असतात. त्याच धर्तीवर कामा रुग्णालयातही ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

महिनाभराचा कालवधी सीएसएसडी विभागामुळे निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया अधिक सुरक्षित, शास्त्रशुद्ध आणि प्रभावी होणार आहे. या विभागाला कार्यान्वित होण्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार असून, तो लवकरच रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे.

शस्त्रक्रियेनंतर सुमारे एक टक्का रुग्णांना संसर्ग होतो. हे रुग्णालय मातृ व बालरोगांसाठी समर्पित असल्याने सिझेरियन प्रसूतीनंतर अशा संसर्गाच्या घटना तुलनेने अधिक दिसून येते. नवजात अतिदक्षता विभागात (एनआयसीयू) दाखल असलेल्या अकाली जन्मलेल्या बाळांसाठी संसर्गाचा धोका अधिक गंभीर असतो. अशा बाळांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने अगदी किरकोळ संसर्गही जीवघेणा ठरू शकतो. - डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा रुग्णालय.

प्रचलित पद्धत काय?यापूर्वी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचे निर्जंतुकीकरण प्रामुख्याने वाफेच्या ऑटोक्लेव्ह प्रणालीद्वारे केले जात होते. मात्र, या प्रक्रियेत काही मर्यादा आणि प्रक्रियात्मक त्रुटी होण्याची शक्यता होती. “बॅक्टेरिया आणि बुरशी नष्ट करण्यासाठी ऑटोक्लेव्हवर अवलंबून राहावे लागत होते. त्यामुळे क्रॉस-कंटॅमिनेशनचा धोका वाढत होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Kama Hospital to Curb Infections with New CSSD Department

Web Summary : Kama Hospital is launching a Central Sterile Supply Department (CSSD) to reduce hospital-acquired infections. This ₹2 crore facility will sterilize equipment using advanced methods, improving patient safety, and reducing hospital stay duration and costs. The department is expected to be operational within a month.
टॅग्स :हॉस्पिटल