झेनिथ धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

By Admin | Updated: June 29, 2015 23:09 IST2015-06-29T23:09:20+5:302015-06-29T23:09:20+5:30

रायगड जिल्ह्यातील खोपोलीमधील झेनिथ धबधब्यावर वर्षा सहलींचे आगमन होत आहे. रविवारी पर्यटकांची तुफान गर्दी येथे पहावयास मिळत आहे.

The crowd of tourists on Zenith Falls | झेनिथ धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

झेनिथ धबधब्यावर पर्यटकांची गर्दी

चिरनेर : उरण तालुक्यातील अनेक गावांना दरड कोसळण्याचा धोका असून प्रशासनाने वेळीच उपाययोजना केली नाही तर पुणे येथील माळीण गावासारखी दुर्घटना घडण्याचा धोका आहे. उरण तहसील कार्यालयातर्फेअशा धोकादायक ठिकाणांची माहिती घेण्यात येत आहे. उरण शहराजवळील डाऊरनगर, गणेशपुरी, चिरनेर, माकडडोरा आणि अक्कादेवी आदिवासीवाडी, मोरा, भवरा, मांगीरदेव झोपडपट्टी या गावांना सर्वाधिक दरड कोसळण्याचा धोका आहे. चाणजे ग्रामपंचायत हद्दीतील द्रोणागिरी डोंगरांच्या पायथ्याशी वसलेल्या डाऊर नगर आणि गणेश नगर या गावांना सर्वात जास्त धोका असून डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या या गावातील लोकांनी घरे बांधताना अक्षरश: डोंगरांचा पायथा पोखरून डोंगरात घरे बांधली आहेत. ही घरे बांधताना डोंगर सपाटीकरणासाठी मोठ-मोठ्या पोकलनचा वापर केला असल्याने येथील माती भुसभुशीत झाली आहे. काही ठिकाणी तर या डोंगराचे धस कोसळण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे पावसाळ्यात येथे केव्हाही भूस्खलनाचा किंवा दरड कोसळून आपत्ती होण्याचा धोका आहे. उरण शहर,ओएनजीसी कंपनीच्या जवळ असलेल्या मोक्याच्या ठिकाणी असलेल्या द्रोणागिरी डोंगराच्या पायथ्याशी सध्या मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. ही जमीन सिडको आणि वनविभागाची असल्याचे बोलले जाते. याच जागेवर अनधिकृत बांधकामातून डाऊर नगर , गणेश नगर उभे आहे. (वार्ताहर ) उरण तालुक्यातील इतर कुठेही भूस्खलनाचा किंवा दरड कोसळण्याचा धोका नसला तरी डाऊर नगर, गणेश नगर, मोरा या ठिकाणी अशा प्रकारचा धोका असून या भागांतील तलाठ्यांना त्या परिसरांचे सर्वेक्षण करावयास सांगितले आहे. तसा अहवाल भूगर्भ तज्ज्ञांना देऊन त्याबाबत उपाययोजना करण्यात येतील. - नितीन चव्हाण, तहसीलदार, उरण

Web Title: The crowd of tourists on Zenith Falls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.