माउंट मेरीच्या जत्रेला गर्दी

By Admin | Updated: September 16, 2014 01:11 IST2014-09-16T01:11:38+5:302014-09-16T01:11:38+5:30

अनेक वर्षाची परंपरा असलेली माऊंट मेरीची जत्र वांद्रे येथील रोमन कॅथलिक माऊंट मेरी चर्चमध्ये रविवारपासून सुरू झाली. 21 सप्टेंबर्पयत ही जत्र सुरू राहणार आहे.

The crowd of Mount Mary is crowded | माउंट मेरीच्या जत्रेला गर्दी

माउंट मेरीच्या जत्रेला गर्दी

मुंबई : अनेक वर्षाची परंपरा असलेली माऊंट मेरीची जत्र वांद्रे येथील रोमन कॅथलिक माऊंट मेरी चर्चमध्ये रविवारपासून सुरू झाली. 21 सप्टेंबर्पयत ही जत्र सुरू राहणार आहे. येशू ािस्तांची आई मेरीचा जन्म 8 सप्टेंबरला झाला म्हणून सप्टेंबर महिन्याच्या दुस:या रविवारी कॅथलिक मेरीची प्रार्थना करतात आणि माऊंट मेरीच्या जत्रेला सुरवात होते, असे स्थानिक नागरिक सांगतात. आठवडय़ाभरात लाखो भाविक येत असल्याने पोलीस बंदोबस्तही चोख ठेवण्यात आला आहे.
हात, पाय, बाहुली अशा विविध आकारांच्या रंगीत मेणबत्त्या, हार-फुले-प्रसाद विकणा:यांकडे उसळलेली गर्दी, खाऊ आणि अन्य किरकोळ वस्तूंचे स्टॉल्सने हा संपूर्ण परिसर गजबजला आहे. त्यात मसाले, मुखवासाचे पदार्थ, खाजा, लाह्या अशा खाद्यपदार्थापासून मुलामुलींचे कपडे, चपला, बॅग्ज तसेच गृहसजावटीच्या वस्तू अशा अनेक स्टॉल्सनी हे रस्ते गजबजून गेले आहेत. या आकषर्णामुळे जत्रेला येणा:यांत महाविद्यालयीन विद्याथ्र्याची संख्या मोठी आहे. काबूली चण्यांची विक्री येथे मोठय़ा प्रमाणावर होते. लहान मुलांसाठी वेगवेगळय़ा राइड्स, आकाशपाळणो इथे आहेत. शिवाय वांद्रे किल्ला आणि बँडस्टँडही जवळच आहे. त्यामुळे बच्चेकंपनीला घेऊन येणा:या आई-बाबांची गर्दी जत्रेत अधिक दिसत आहे.  (प्रतिनिधी)
 
च्या देवीला कोळी लोक पर्ल देवी म्हणजेच मोती देवी असेही संबोधतात. आपले आजार बरे व्हावेत, यासाठी शरीराच्या त्या-त्या आकारातील प्रतिकृतीच्या मेणबत्त्या देवीसमोर ठेवतात.
च्पवित्र माऊंट मेरी कुमारी माता होती. मेरीने समाजसुधारणोसाठी येशूला जन्माला घालण्यासाठी त्या काळातील व्यवस्थेच्या विरोधाला धाडसाने तोंड दिले. 

 

Web Title: The crowd of Mount Mary is crowded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.