मेट्रो चाचणीवेळी गर्दी; साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:06 IST2021-06-01T04:06:00+5:302021-06-01T04:06:00+5:30

मुंबई : मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मार्गांवर आता मेट्रोची चाचणी घेण्यात येणार असून, या चाचणीचा ...

Crowd during metro test; The fuss of social distance | मेट्रो चाचणीवेळी गर्दी; साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मेट्रो चाचणीवेळी गर्दी; साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मुंबई : मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ या दोन्ही मार्गांवर आता मेट्रोची चाचणी घेण्यात येणार असून, या चाचणीचा उद्घाटन सोहळा सोमवारी दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आकुर्ली मेट्रो स्थानकावर पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्र्यांचा लवाजमा आणि बाकीची मंडळीही होती. साहजिकच आकुर्ली मेट्रो स्थानकावर साेशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र हाेते. उपस्थितांनी मास्क परिधान केले असले तरी प्रत्यक्षात मात्र ‘दो गज की दुरी’ कुठेच दिसत नव्हती. परिणामी या सोहळ्यातील गर्दीवर सर्वच स्तरातून विशेषत: समाजमाध्यमांहून टीका झाली. किती ही गर्दी. सरकारी सोहळा म्हणून काय झाले. मुख्यमंत्री, मंत्री आहेत म्हणून कोरोना निर्बंध नाही पाळणार? लग्नाला ५० लोक नाही चालत. मग मेट्रोच्या कार्यक्रमाला एवढी गर्दी कशी? असे अनेक सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केले.

........................................

Web Title: Crowd during metro test; The fuss of social distance