Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे रुळ ओलांडणे जीवावर बेतले, ट्रेनच्या धडकेत एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

By गौरी टेंबकर | Updated: June 11, 2024 11:38 IST

बोरिवली रेल्वे पोलिसांनी मृतदेह कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

मुंबई: बोरिवली रेल्वे स्थानकावर १० जून रोजी रुळ ओलांडताना लोकल ट्रेनच्या धडकेत एका ५० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. मृताची ओळख अद्याप उघड झालेली नाही. बोरिवली रेल्वे पोलिसांनी मृतदेह कांदिवली पश्चिम येथील शताब्दी रुग्णालयात पाठवला आहे. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १० जून रोजी दुपारी १.१७ वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी आणि राम मंदिर रेल्वे स्थानकादरम्यान हा माणूस रेल्वे रूळ ओलांडत होता. त्याच वेळी चर्चगेटहून विरारच्या दिशेने येणाऱ्या जलद लोकल ट्रेनने त्या व्यक्तीला धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. रेल्वे पोलिसांनी त्याला शताब्दी रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. त्यानुसार त्याची ओळख पटविण्याचा प्रयत्न सध्या पोलीस करत आहेत. 

टॅग्स :रेल्वेमुंबई