अवेळी पावसाने शेतक:यांवर संकट

By Admin | Updated: November 15, 2014 22:52 IST2014-11-15T22:52:26+5:302014-11-15T22:52:26+5:30

पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी पडल्याने कापणी न झालेल्या भातासह काजू, आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून गुरांचा चारा भिजल्याने शेतक:यांसमोर मोठे संकट उभे राहिले आह़े

Crisis on uneven rains of farmers: | अवेळी पावसाने शेतक:यांवर संकट

अवेळी पावसाने शेतक:यांवर संकट

ठाणो : जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून ठाणो- घोडबंदर परिसरासह उल्हासनगर, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, शहापूर, मुरबाड तालुक्यांत ठिकठिकाणी पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी पडल्याने कापणी न झालेल्या भातासह काजू, आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असून गुरांचा चारा भिजल्याने शेतक:यांसमोर मोठे संकट उभे राहिले आह़े ज्या पिकांसाठी राबराब राबलो, ते पीक असे अवेळी पावसात नष्ट होताना पाहताना जिल्ह्यातील बळीराजाच्या डोळ्यांत पाणी आले होत़े
कापणी न केल्यामुळे उभ्या असलेल्या सुमारे 5 ते 1क् टक्के भातपिकांचे या पावसामुळे नुकसान होऊ घातले आहे. जिल्ह्याच्या शहापूर, मुरबाड परिसरात पाऊस पडत असल्यामुळे उभ्या भाताचे नुकसान होत आहे. जनावरांचा चारा खराब होत आहे. मोहर गळून पडत असल्यामुळे आंबा, काजूचे नुकसान  होत आहे. पालेभाज्याचे नुकसान सुरू आहे. फुलशेतीसह चिकूचे या पावसामुळे नुकसान नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)
 
1किन्हवली - शुक्रवार सकाळपासून पावसाने लावलेल्या रिपरिपीने शेतक:यांचा शेतातील भात भिजला आहे. रस्त्यातील खड्डे भरले आहेत. शाळकरी मुलांना व नोकरदारांना पुन्हा छत्र्या घेऊन घराबाहेर पडावे लागले आहे.
2किन्हवली, शेणवे, आपटे, टाकीपठार, सोगाव, संगम गाव परिसरात शुक्र वारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाच्या रिपरिपीने सर्वत्र ओलेचिंब झाले असून शेतक:यांनी नुकतेच सराई करून खळ्यात आणलेले भाताचे भारे भिजल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. भात भिजल्याने ते उबल्यानंतर भात काळा पडून तांदूळ निकृष्ट निघत असल्याने गरिबांचा आधार असलेला विक्र ीसाठीचा भात व्यापारी पडत्या भावात मागणार, या चिंतेत दिसून येत आहे. भाताला पाणी लागू नये म्हणून शेतक:यांनी उडवी ताडपत्रीने झाकण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. 
 
4टोकावडे/भातसानगर :  तीन दिवस संततधार पाऊस पडत असल्याने कापणी करून खळ्यात ठेवलेले भाताचे भारे भिजले आहेत. झोडणी केलेला पेंढा भिजला आहे. त्यामुळे हा पेंढा काळा पडून बुरशी लागण्याची शक्यता असल्याने गुरांच्या वैरणीचा प्रश्नसुद्धा निर्माण होणार आहे. उडीद, नाचणी, खुरासणी ही पिकेदेखील वाया जाण्याची शक्यता आहे. शेतक:यांचे जीवनमान केवळ शेतीवरच अवलंबून असताना निसर्ग साथ देत नसल्याने शेतीच धोक्यात आली आहे. आधीच भातपिके दाणोविरहित असल्याने उत्पादन घटल्याने चिंतेत असलेल्या शेतक:यांची जमिनीत असलेल्या ओलसरतेचा फायदा घेऊन हरभरा, तूर, चवळी आदी पिके घेण्यासाठीची लगबग झाली. हरभ:याला फुले येत असतानाच पडलेल्या पावसाने सारे पीक कुजण्याच्या मार्गावर आह़े भेंडी, कारली, काकडी यांच्या कळ्या, फुले गळून पडली आहेत. 
 
3भातपिकानंतर भेंडी, काकडी काढण्यासाठी उखळण केलेल्या जमिनीवर पाणी पडल्याने स:या पाडणो, वाफे तयार करण्यात अडचणी निर्माण होऊन काम लांबणार असल्याने बर्डेपाडा गावातील शेतकरी चिंता व्यक्त करीत आहेत. सततच्या पडलेल्या पावसाने रस्त्यातील खड्डय़ांमध्ये पाणी साठल्याने त्यांचे अस्तित्व पुन्हा दिसून येऊ लागले. सर्वत्र ओलेचिंब झाले असून नोकरदार व शाळकरी मुलांनाही छत्र्या घेऊन बाहेर पडावे लागले आहे. या पावसात जर भात भिजून काळा पडल्यास तोंडात पडायला आलेला घास हिरावून घेतला जाणार असल्याचे शेतकरी बोलत आहेत.
 
4खळ्यात आणून ठेवलेले भातपीक भिजून ढिगा:यात उष्णता वाढल्याने परिणामी तांदूळ ठिसूळ होणार आहे. शिवाय, पेंढय़ालाही कुबट वास येऊन गुरांच्याही आरोग्यावर परिणाम होणार आहे. हे नुकसान असह्य झाले आहे. ज्या वेळी पावसाची गरज होती, त्या वेळी पाऊस न पडल्याने भातपिकाचे दाणो तसेच सुकून उत्पादन घटले आहे. आता ते घेण्याच्या वेळी पुन्हा पाऊस पडल्याने शेतक:यांवर अस्मानी संकट कोसळले आह़े

 

Web Title: Crisis on uneven rains of farmers:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.