कारची काच तोडून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:06 IST2021-04-11T04:06:51+5:302021-04-11T04:06:51+5:30

मुंबई : मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात गाडीची काच फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला चेंबूर पोलिसांनी अटक ...

A criminal who broke the glass of a car and stole it was handcuffed | कारची काच तोडून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या

कारची काच तोडून चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला बेड्या

मुंबई : मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरात गाडीची काच फोडून चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला चेंबूर पोलिसांनी अटक केली आहे. तौसिफ इकबाल गोरमे (वय ३५) असे या आरोपीचे नाव असून तो घाटकोपरच्या रमाबाईनगर परिसरातील रहिवासी आहे. १ एप्रिल रोजी चेंबूर पोलीस ठाण्यात एका व्यक्तीने चोरीची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. व यानंतर आरोपीला घाटकोपरच्या रमाबाईनगर येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. यावेळी या आरोपीकडून ३ दुचाकी, १२ मोबाईल, २७ लॅपटॉप बॅग, किमती घड्याळ, इलेक्ट्रॉनिक वस्तू, पासपोर्ट, महत्त्वाची कागदपत्रे, आधारकार्ड, पॅन कार्ड, हेड फोन, आय पॉड अशा एकूण ५ लाख ७२ हजार रुपये किमतीच्या वस्तू हस्तगत करण्यात आल्या. या आरोपीवर मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ३१ गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: A criminal who broke the glass of a car and stole it was handcuffed