एक्स्प्रेसवे बनतोय गुन्हेगारांचा अड्डा

By Admin | Updated: August 4, 2014 00:18 IST2014-08-04T00:18:33+5:302014-08-04T00:18:33+5:30

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अहमदनगरमधील एका व्यापा-याला लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने पुन्हा एकदा एक्स्प्रेस वेवरील प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे

Criminal trafficking | एक्स्प्रेसवे बनतोय गुन्हेगारांचा अड्डा

एक्स्प्रेसवे बनतोय गुन्हेगारांचा अड्डा

अमोल पाटील, खालापूर
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अहमदनगरमधील एका व्यापा-याला लुटण्याचा धक्कादायक प्रकार घडल्याने पुन्हा एकदा एक्स्प्रेस
वेवरील प्रवाशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात प्रवाशांना मारहाण करून लुटमार करण्याच्या घटना सातत्याने उजेडात येत असतानाही रायगड पोलिस मात्र यावर आपला अंकुश ठेवण्यात सपशेल अपयशी झाले आहेत.
मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवासादरम्यान अंतर कमी करण्यासाठी एक्स्प्रेसवेची निर्मिती करण्यात आली. जलद आणि सुखकर प्रवास सुरु देखील झाला परंतु गुन्हेगारी देखील दिवसेंदिवस वाढत आहे. एक्स्प्रेसवे वर विश्रांतीसाठी खालापूर
नजीक हॉटेल्स असल्याने पुण्या मुंबईच्या मध्ये फूड मॉलला दोन्ही मार्गावरील वाहने आवर्जून विश्रांतीसाठी थांबतात. प्रवास
सुखकर होण्यासाठी घेण्यात येणारी विश्रांती प्रवाशांसाठी सुरुवातीपासून डोकेदुखी ठरत आहे. वाढत्या लुटमारी, चोरीच्या घटनांनी
प्रवाशांच्या जीविताची आणि सामानाची सुरक्षा ऐरणीवर आली आहे .गेल्या दोन वर्षात तब्बल चाळीस चोऱ्या, लूटमार, दरोड्याच्या घटना खालापूर, खोपोली पोलिसांच्या हद्दीत घडत आहेत.

Web Title: Criminal trafficking

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.