६ कंपन्या, मालक, ११ दूध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

By Admin | Updated: December 15, 2014 23:53 IST2014-12-15T23:53:05+5:302014-12-15T23:53:05+5:30

दूध भेसळ विरोधात विशेष मोहिमेद्वारे घेतलेल्या नमुन्यांपैकी ६ नमुन्यामधील दूध खाण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्या सहा कंपन्यांसह अकरा दूध विक्रेते

Criminal cases filed against 6 companies, owners, 11 milk vendors | ६ कंपन्या, मालक, ११ दूध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

६ कंपन्या, मालक, ११ दूध विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

ठाणे : दूध भेसळ विरोधात विशेष मोहिमेद्वारे घेतलेल्या नमुन्यांपैकी ६ नमुन्यामधील दूध खाण्यास अयोग्य असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्या सहा कंपन्यांसह अकरा दूध विक्रेते आणि मालकांविरोधात ठाणे अन्न व औषध प्रशासन (कोकण) विभागाने पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत.
दूध भेसळीस आळा बसण्यासाठी अन्न व औषध प्रशासनामार्फत जळगाव,कोल्हापूर नंतर मुंबई आणि ठाो विभागात विशेष मोहिम हाती घेतली़ त्यानुसार मंगळवारी ९ डिसेंबर रोजी मुंबई आणि ठाणे विभागात उत्पादक, पुरवठादार व किरकोळी व्यापारी अशा सर्वस्तरावर एकूण ८१ दूधाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले होते. त्यामध्ये रायगड, ठाणे, सांगली, पालघर, आणि मुंबईतील ६ नामंकित कंपन्यांचा समावेश आहे. त्या कंपन्यांसह सुपरवायझर दत्ता पवार, मालक निजामुद्दीन गयासुद्दीन खान, विक्रेता किसन गुजर, मालक शिवराम गुजर आणि मालक गनी हाजी बशिर मेमन अशा ५ व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल केल्याची माहिती कोकण विभागाचे (अन्न) सह-आयुक्त सुरेश देशमुख यांनी दिली. दूध भेसळबाबत तक्रार असल्यास अन्न व औषध प्रशासनाने नुकत्याच सुरु केलेल्या नियंत्रण कक्षाकडे तक्रार करावी असे आवाहन विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Criminal cases filed against 6 companies, owners, 11 milk vendors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.