सराईत गुन्हेगाराला खारघरमधून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:07 IST2021-09-19T04:07:31+5:302021-09-19T04:07:31+5:30

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एका सराईत तस्कराला अटक केली. त्याच्याकडून एमडी ...

Criminal arrested in Kharghar | सराईत गुन्हेगाराला खारघरमधून अटक

सराईत गुन्हेगाराला खारघरमधून अटक

मुंबई : अमली पदार्थ नियंत्रण कक्षाने (एनसीबी) दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एका सराईत तस्कराला अटक केली. त्याच्याकडून एमडी पावडरसह अन्य ठिकाणाहून २० किलो गांजाची गोणी जप्त केली.

नवी मुंबईतील खारघर सेक्टर १० मध्ये एका अपार्टमेंटमध्ये छापा टाकून मोहम्मद अझीम अबू सालेम उर्फ अझीम भाऊ याला पकडले. तो सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर नागपाडा, जेजे पोलीस ठाणे, क्राइम ब्रँच व खंडणी विरोधी पथकाकडे अनेक गुन्हे दाखल आहेत. खून, हत्येचा प्रयत्न, मारामारीचे गुन्हे दाखल आहेत. एनसीबीने १४ सप्टेंबरला पुण्यात छापा टाकून, त्याच्याकडील २.५ किलो एमडी, ३.९ किलो इफेडरीन, ४५ ग्रॅम चरस जप्त केला होता. त्यामध्ये अझीम हा फरारी आरोपी होता. त्याच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

दुसरी कारवाई कल्याण रेल्वे पोलीस दलाच्या मदतीने करण्यात आली. कोणार्क एक्स्प्रेस ट्रेन नंबर- ११०२०च्या बोगीत एका गोणीमध्ये २० किलो गांजा मिळून आला. त्याच्या मालकाचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Criminal arrested in Kharghar