विक्रोळीतील खंडणीखोरांविरोधात अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे

By Admin | Updated: September 1, 2014 22:45 IST2014-09-01T22:45:40+5:302014-09-01T22:45:40+5:30

विक्रोळी : येथे एका कंत्राटदाराला धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी राजू दिलानी या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस तपासात दिलानी हा धारावी येथील एका कुख्यात टोळीतील सदस्य असून विविध पोलीस ठाण्यांतील गुन्‘ात त्याचा शोध सुरू होता.

Crime in several police stations against the Vikroli rioters | विक्रोळीतील खंडणीखोरांविरोधात अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे

विक्रोळीतील खंडणीखोरांविरोधात अनेक पोलीस ठाण्यांत गुन्हे

क्रोळी : येथे एका कंत्राटदाराला धमकावून खंडणी मागितल्याप्रकरणी राजू दिलानी या आरोपीला पोलिसांनी अटक केली होती. पोलीस तपासात दिलानी हा धारावी येथील एका कुख्यात टोळीतील सदस्य असून विविध पोलीस ठाण्यांतील गुन्‘ात त्याचा शोध सुरू होता.
बुधवारी २७ ऑगस्ट रोजी दिलानी आणि त्याच्या साथीदारांनी श्रीराज शेख या व्यावसायिकाला वाटेत अडवून २०११ साली बांधकामासंबंधी झालेल्या व्यवहारातील थकीत पैशांची मागणी केली. या वेळी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून पैसे दिले नाहीत तर ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी शेख यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिलानीला धमकी, खंडणी आणि भारतीय हत्यार कायद्यांतर्गत अटक केली होती.
पोलीस तपासात दिलानी हा अभिलेखावरील आरोपी असून विविध पोलीस ठाण्यांत त्याच्याविरोधात मारहाण, हत्येचा प्रयत्न, अपहरणासारख्या गुन्‘ांची नोंद असून पोलीस त्याचा शोध घेत होते. २०११ मध्ये नेहरूनगर पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याचा शोध सुरू होता, तर दुसरीकडे धारावीमध्ये अपहरण, मारहाणीसारख्या गुन्‘ांतीलदेखील तो आरोपी आहे. यापैकी काही गुन्‘ांमध्ये त्याने शिक्षाही भोगली आहे. सध्या दिलानी कोठडीची हवा खात असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती विक्रोळी पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Crime in several police stations against the Vikroli rioters