Join us  

Crime Patrol चा होस्ट अनुप सोनी बनला रियल लाइफ 'क्राइम सीन इंवेस्टिगेटर'

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 3:13 PM

Crime Patrol host Anup Soni: अनुप सोनीने क्राइम सीन इन्वेस्टिगेशनमध्ये सर्टिफिकेट कोर्स केला आहे.

ठळक मुद्देअनूप सोनीने क्राइम पेट्रोलसह अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.

नवी दिल्ली:क्राइम पेट्रोल या लोकप्रिय कार्यक्रमाचा होस्ट अनुप सोनी आता खऱ्या आयुष्यात 'क्राइम सीन इन्वेस्टिगेटर' झाला आहे. अनुपने आपल्या सोशल मीडियावरुन माहिती दिली की, त्याने इंटरनॅशनल फोरेंसिक सायंस (IFS) एजुकेशन डिपार्टमेंटमधून क्राइम सीन अन्वेस्टिगेशनमध्ये सर्टिफिकेट कोर्स पूर्ण केलाय. 

अनुपने आपल्या सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत लिहीले की, लॉकडाउन काळात मी माझा वेळ आणि उर्जा काहीतरी वेगळं करण्यात घालवायचा निर्णय घेतला होता. म्हणून मी हा कोर्स केला. या वयात अभ्यास करणे, हे माझ्यासाठी मोठं आव्हानं होतं. पण, आता हा कोर्स पुर्ण केल्याचा मला गर्व आहे. अनुपने हा फोटो शेअर केल्यानंतर त्याचे चाहते आणि मित्रांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 

सीआयडीमध्ये साकारलंय अजातशत्रुचे पात्रअनूप सोनीने 2010 पासून 2018 पर्यंत क्राइम पेट्रोलचा होस्ट म्हणून काम केले आहे. क्राइम पेट्रोलसह त्याने सीआयडीमध्ये एसीपी अजातशत्रुचे पात्र साकारले होते. त्यासोबतच कहानी घर घर की, बालिका वधू आणि सी हाक्स सारख्या टीव्ही शोजमध्येही काम केले आहे. टीव्हीसह त्याने गंगाजल, प्रस्थानम, राज, अपहरण आणि सत्यमेव जयते 2 सारख्या चित्रपटातही काम केले आहे. 

टॅग्स :मुंबईअनुप सोनीबॉलिवूडक्राइम पेट्रोल