Crime News: पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2023 14:07 IST2023-04-19T14:07:20+5:302023-04-19T14:07:35+5:30
Crime News: घाटकोपरमध्ये ‘इसा स्पा’ या मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पार्क साइट पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

Crime News: पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय
मुंबई : घाटकोपरमध्ये ‘इसा स्पा’ या मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पार्क साइट पोलिसांच्या कारवाईतून उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.
घाटकोपर येथील रेसिडेन्सियल प्लाझामध्ये असलेल्या इसा स्पा मध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळताच पथकाने बनावट ग्राहक पाठवून सापळा रचला. वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच पथकाने छापा टाकून कारवाई केली आहे.
याप्रकरणी आस्थापना मालक निरव गांधी, व्यवस्थापक सूरज शिंदे विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मसाज पार्लरच्या नावाखालीवेश्या व्यवसाय सुरू होता. यापूर्वी गुन्हे शाखेने प्रभादेवीमध्ये स्पाच्या नावाखाली सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केला.
सिल्वर थायी स्पा येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ३ ला मिळाली. त्यानुसार, गुन्हे शाखेने बोगस ग्राहक पाठवून कारवाई केली. तेव्हा, स्पा चालक मोहम्मद हुसेन ऊर्फ सोनू मोहम्मद अकम शेख (२५), व्यवस्थापक दीपू नारायण (३२), तसेच जागा मालक नीलेश शहा हे स्पा मसाज सेंटरच्या नावाखाली जागेचा वापर कुंटणखान्यासाठी करत असल्याचे दिसून आले. त्यानुसार, गुन्हा नोंदवीत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.