मयांक गांधींवर गुन्हा
By Admin | Updated: September 21, 2014 03:11 IST2014-09-21T03:11:07+5:302014-09-21T03:11:07+5:30
आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांच्यासह एकूण सहा कार्यकत्र्याविरोधात ओशिवरा पोलिसांनी विनयभंग व धमकीचा गुन्हा नोंदविला.

मयांक गांधींवर गुन्हा
मुंबई : आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयांक गांधी यांच्यासह एकूण सहा कार्यकत्र्याविरोधात ओशिवरा पोलिसांनी विनयभंग व धमकीचा गुन्हा नोंदविला. त्यात एका महिलेचाही सहभाग आहे. पोलीस प्रवक्ते उपायुक्त धनंजय कुलकर्णी यांनी या वृत्तास दुजोरा दिला. पेशाने शिक्षक असलेल्या 21 वर्षीय तरुणीने विनयभंग, धमकीची तक्रार दिली होती. तरुण सिंग, विनय मिo्र, सॅम, कविता अशी अन्य आरोपींची नावे आहेत. अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.