अभिनेता साहिल खानसह तिघांंविरोधात गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:06 IST2021-09-18T04:06:21+5:302021-09-18T04:06:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मिस्टर इंडिया पुरस्कार पटकावणारा बॉडी बिल्डर मनोज पाटील याला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ...

Crime against three including actor Sahil Khan | अभिनेता साहिल खानसह तिघांंविरोधात गुन्हा

अभिनेता साहिल खानसह तिघांंविरोधात गुन्हा

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मिस्टर इंडिया पुरस्कार पटकावणारा बॉडी बिल्डर मनोज पाटील याला आत्महत्येचा प्रयत्न करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अभिनेता साहिल खानसह तिघांविरोधात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी ओशिवरा पोलीस अधिक तपास करत आहेत.

बुधवारी रात्री विषारी गोळ्या घेत मनोज पाटील याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मनोज याला उपचारासाठी कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तेथे त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याने लिहिलेल्या एक सुसाइड नोटमध्ये अभिनेता साहिल खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून साहिल खान आपल्याला विनाकारण त्रास देतो आणि सोशल मीडियात बदनामी करत आहे. त्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे मनोजने म्हटले होते. या घटनेनंतर त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून मुंबई पोलिसांनी कारवाई करत अभिनेता साहिल खान आणि इतर तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Crime against three including actor Sahil Khan