पन्नास जणांवर गुन्हा
By Admin | Updated: September 12, 2014 22:39 IST2014-09-12T22:39:00+5:302014-09-12T22:39:00+5:30
अकलूज : परवानगी न घेता छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी 13 जणांसह इतर अनोळखी 50 जणांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पन्नास जणांवर गुन्हा
अ लूज : परवानगी न घेता छ. शिवाजी महाराज यांचा पुतळा बसविल्याप्रकरणी आणि बेकायदेशीर जमाव केल्याप्रकरणी 13 जणांसह इतर अनोळखी 50 जणांवर अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री 10 च्या सुमारास सदुभाऊ चौकामध्ये आण्णा शिंदे, सुदर्शन मिसाळ, आबा वाघमारे, संग्राम भिलारे, सूरज गोडसे, विठ्ठल गोरे, हर्षल भुतनाळ, महेश पवार, पप्पू ढेरे, विकी गोरे, दिलीप कुरुडकर, आनंद कुरुडकर, संजय क्षीरसागर या 13 जणांसह अनोळखी 50 जणांनी छ. शिवाजी महाराजांचा सिंहारुढ पुतळा बसवला. त्याबद्दल पोलीस नाईक तुषार गाडे यांनी अकलूज पोलिसात फिर्याद दिल्यावरून 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणासही अटक करण्यात आलेली नाही. तपास स. पो. नि. ए. ए. जाधव हे करीत आहेत.