लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : एका हिंदी वृत्तपत्रात डॉक्टरांविषयी आक्षेपार्ह भाष्य करीत कॉमेडियन सुनील पाल यांनी सोशल मीडियावर त्याचा व्हिडिओ व्हायरल केला. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटच्या अध्यक्षा सुश्मिता भटनागर यांच्या तक्रारीवरून मंगळवारी पाल यांच्यावर अंधेरी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.पाल यांनी एका हिंदी वृत्तपत्राशी संपर्क साधून डाॅक्टरांविरोधात एक व्हिडिओ फेसबुकवर प्रसारित केल्याचे २० एप्रिल रोजी भटनागर यांच्या नजरेस पडले. पाल यांनी यात कोरोना संकटात डॉक्टरांविरोधात जनतेच्या भावना भडकाविणारे, लोकांना भयभीत करून डाॅक्टारांविषयी असंतोष निर्माण करणारे आक्षेपार्ह विधान केले आहे, अशी भटनागर यांची तक्रार आहे.
कॉमेडियन सुनील पालविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 05:44 IST