Join us
Daily Top 2Weekly Top 5

क्रिकेटपटू यशस्वी जैसवालने वांद्र्यात खरेदी केला ५ कोटींचा आलीशान फ्लॅट

By मनोज गडनीस | Updated: February 21, 2024 17:32 IST

यशस्वी जैसवाल याने अलीकडेच वांद्रा पूर्वे येथे ५ कोटी ३८ लाख रुपयांना एका आलीशान फ्लॅटची खरेदी केली आहे.

मनोज गडनीस, मुंबई : धडाकेबाज फलंदाजीमुळे चर्चेत असलेला तरुण क्रिकेटपटू यशस्वी जैसवाल याने अलीकडेच वांद्रा पूर्वे येथे ५ कोटी ३८ लाख रुपयांना एका आलीशान फ्लॅटची खरेदी केली आहे. त्याच्या फ्लॅटचे आकारमान १११० चौरस फूट असून सध्या या इमारतीचे बांधकाम सुरू आहे.

 ७ जानेवारी रोजी त्याने या घराच्या खरेदीची नोंदणी केल्याची माहिती आहे.बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकारांच्या वास्तव्यामुळे वांद्रे पश्चिम हा परिसर आजवर चर्चेत होता. मात्र, अलीकडच्या काळात विशेषतः बीकेसी परिसरात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये सुरू झाल्यानंतर वांद्रे पूर्व हा परिसर देखील आता मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना आकृष्ट करत आहेत. मुंबईतील अनेक नामांकित विकासक कंपन्यांनी वांद्रे पूर्व येथे आपले आलीशान गृहनिर्माण प्रकल्प उभे केले आहेत. उपलब्ध माहितीनुसार, जैसवाल याने या फ्लॅटच्या खरेदीकरिता प्रति चौरस फूट ४८ हजार रुपयांचा दर मोजला आहे.

टॅग्स :यशस्वी जैस्वालसुंदर गृहनियोजन