डीसी अवंतीविरुद्ध क्रिकेटरची न्यायालयात धाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:09 IST2020-12-30T04:09:00+5:302020-12-30T04:09:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : भारताची पहिली स्पोर्ट्स कार म्हणून प्रसिद्ध असलेली डीसी अवंती यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. ...

डीसी अवंतीविरुद्ध क्रिकेटरची न्यायालयात धाव
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारताची पहिली स्पोर्ट्स कार म्हणून प्रसिद्ध असलेली डीसी अवंती यापूर्वीही वादाच्या भोवऱ्यात अडकली होती. २०१३ मध्ये बुकिंग करूनही वेळेत डिलिव्हरी न देता, आगाऊ भरलेले पाच लाख रुपये परत न मिळाल्याने क्रिकेटपटू दिनेश कार्तिक यांनी चेन्नईच्या ग्राहक न्यायालयात २०१५ मध्ये धाव घेतली होती.
२०१८ मध्ये दिलीप छाब्रिया डिझाइन प्रायव्हेट लिमिटेड यांनी स्वत:च्या कंपनीला दिवाळखोरी घोषित करण्याची तयारी केली होती. छाब्रिया यांच्या अटकेने खळबळ उडाली आहे. ही कारवाई सहपोलीस आयुक्त मिलिंद भारांबे, अपर पोलीस आयुक्त वीरेश प्रभू, पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
......................
....