सासवणेत गुरचरण जागेवर क्रिकेटचे मैदान

By Admin | Updated: January 15, 2015 23:01 IST2015-01-15T23:01:40+5:302015-01-15T23:01:40+5:30

अलिबाग तालुक्यातील सासवणे ग्रामपंचायत हद्दीतील ३३७ या मिळकतीवर क्रिकेटचे मैदान उभारण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे.

Cricket grounds at Sasavat's Gurcharan premises | सासवणेत गुरचरण जागेवर क्रिकेटचे मैदान

सासवणेत गुरचरण जागेवर क्रिकेटचे मैदान

बोर्ली-मांडला : अलिबाग तालुक्यातील सासवणे ग्रामपंचायत हद्दीतील ३३७ या मिळकतीवर क्रिकेटचे मैदान उभारण्यास ग्रामस्थांनी विरोध केला आहे. ती जागा गुरचरण आहे. यासंदर्भात ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी सुमंत भांगे, तहसीलदार विनोद खिरोळकर यांच्याकडे तसे निवेदन सादर के ले आहे.
गट नं. ३३७ ही मिळकत गुरचरण म्हणून महाराष्ट्र शासनाने ग्रामपंचायतीला प्रदान केली. या मिळकतीचा वापर गुरे चरण्यासाठी करीत असतात. बहुसंख्य ग्रामस्थांचा शेती आणि दूध विक्रीचा व्यवसाय असल्यामुळे या ग्रामस्थांना गुरचरण्याची नितांत गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ही वस्तुस्थिती असताना या गुरचरणावर क्रिकेट मैदान तयार करण्याकरिता झाडे तोडण्याचे आणि येण्या-जाण्याचा मार्ग बदलण्याचा प्रकार सुरू असल्याने त्याला संबंधित ग्रामस्थांचा विरोध आहे. हे प्रकरण गेल्या वर्षापासून सुरू आहे. ३० जानेवारी व २० फेब्रुवारी २०१४ रोजी संबंधित ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती. तेथे सुरू असलेले भरावाचे काम बंद केले परंतु पुन्हा एकदा या विषयाने उचल खाल्ल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सासवणे ग्रामपंचायती हद्दीतील गट नं. ३३७ हा भूखंड गुरचरण अथवा गावकऱ्यांच्या सार्वजनिक वापरातील कोणतीही व्यक्ती खासगी संस्था यांना कोणत्याही प्रयोजनासाठी मंजूर करण्यात येवू नये, अशी तरतूद असल्याने जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी क्रीडा गणसाठीचा मागणी अर्ज १ सप्टेंबर २०१४ रोजी निकाली होता. दरम्यान पुन्हा एकदा गुरचरणाच्या जागेवर मैदान उभारण्याचे प्रयत्न सुरू झाल्याचे संबंधित ग्रामस्थांचे म्हणणे असून त्याला विरोध करणारे निवेदन राकेश पुरो, महेश वर्तक, सुरेंद्र भगत आदि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी भांगे, तहसीलदार विनोद खिरोळकर यांना सादर केले आहे. (वार्ताहर)

Web Title: Cricket grounds at Sasavat's Gurcharan premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.