Join us  

चिंध्यांच्या गाठोड्याने घेतला चिमुकल्याचा जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2018 7:05 AM

घराशेजारी खेळताना गोदामाबाहेर ठेवलेल्या चिंधीच्या गाठोड्याखाली सापडून पाच वर्षांच्या बालकाचा गुदमरून मृत्यू होण्याची घटना वडाळ्यातील शांतीनगर परिसरात मंगळवारी घडली.

मुंबई  - घराशेजारी खेळताना गोदामाबाहेर ठेवलेल्या चिंधीच्या गाठोड्याखाली सापडून पाच वर्षांच्या बालकाचा गुदमरून मृत्यू होण्याची घटना वडाळ्यातील शांतीनगर परिसरात मंगळवारी घडली. सोहेल सर्वेश राजभर असे त्याचे नाव असून, ऐन सणासुदीला घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.सर्वेश राजभर हे पत्नी व दोन मुले, दोन मुलींसह चार महिन्यांपूर्वीच मुंबईत आले आहे. मंगळवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास त्याचा मुलगा सोहेल दिवाळीनिमित्त नवीन कपडे घालून घराबाहेर खेळत होता. खेळता-खेळता तो चिंध्यांच्या गाठोड्याजवळ गेला असता, एक गाठोडे त्याच्या अंगावर पडले आणि तो गुदमरला.

टॅग्स :मृत्यू