Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठा समाजाचे नेते अ‍ॅड शशिकांतजी पवार यांच्या नावे गिरगाव मध्ये चौकाची निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 19:55 IST

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई - कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकाराने  मराठा समाजाचे नेते आणि  मराठा महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड शशिकांतजी उर्फ आप्पासाहेब पवार यांच्या नावे गिरगाव मध्ये चौकाची निर्मिती करण्यात आली. आज मंत्री लोढा आणि लोकमत समूहाचे चेअरमन विजय दर्डा यांच्या विशेष उपस्थितीत नवलकर लेन कॉर्नर, व्हीपी रोड गिरगाव येथे उभारण्यात आलेल्या या चौकाचे आज उद्घाटन झाले. 

मराठा समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने धडपड करणारे ज्येष्ठ नेते शशिकांत पवार यांची आज प्रथम पुण्यतिथी आहे. त्या निमित्त त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून सदर चौकाची निर्मिती आणि उद्घाटन करण्याचे मंत्री लोढा यांनी ठरवले. येथे ज्येष्ठ नेते शशिकांत पवार यांच्या कार्याबद्दल माहिती देणारा फलक लावण्यात आला आहे. तसेच चौकाचे सुशिभिकरण करणे, दिव्यांची सोय, इत्यादी गोष्टी सुद्धा करण्यात आल्या आहेत.

शब्दात व्यक्त होता येणार नाही इतकं महान व्यक्तिमत्त्व आणि कर्तुत्व अप्पासाहेबांचं होतं. आज त्यांच्यासाठी जमलेली ही गर्दी लोकांचं त्यांच्यावरील प्रेम दर्शवते. त्यांचा जन्म गिरगावात झाला, याच नवलकर लेन मध्ये मराठा महासंघाचं कार्यालय सुद्धा आहे म्हणून चौक उभारण्यासाठी आम्ही या जागेची निवड केली. अप्पासाहेबांचं कार्य हे फक्त मराठा समाजासाठीच मर्यादित नव्हते. समजतील प्रत्येक गरजू व्यक्तीसाठी ते झटले. आज त्यांच्या कार्यातून आपण प्रेरणा घेऊया” असंही मंत्री लोढा म्हणाले.