मद्यधुंद चालकांचा उपद्रव
By Admin | Updated: May 27, 2014 04:46 IST2014-05-27T04:46:39+5:302014-05-27T04:46:39+5:30
मुंबई शहर आणि उपनगरात मद्यधुंद चालकांकडून हैदोस घालण्यात येत असून वाहतूक पोलिसांना ती डोकेदुखीच ठरत आहे

मद्यधुंद चालकांचा उपद्रव
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मद्यधुंद चालकांकडून हैदोस घालण्यात येत असून वाहतूक पोलिसांना ती डोकेदुखीच ठरत आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांतच तब्बल पाच हजार मद्यधुंद चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. दारू पिऊन वाहन चालवणे हा गुन्हा असून त्याविरोधात वाहतूक पोलिसांकडून सातत्याने कारवाई केली जाते. तसेच याबाबत वाहतूक पोलिसांकडून जनजागृतीही केली जाते. तरीही त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि पुन्हा तोचतोच गुन्हाही चालकाकडून केला जातो. २०१३ मध्ये एकूण १५ हजार ८९७ मद्यधुंद चालकांना पकडण्यात आले असून तब्बल ४ हजार ९७३ जणांना साध्या कैदेची शिक्षा भोगावी लागली आहे. तर ३ हजार ४२२ चालकांचा परवानाच रद्द करण्यात आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे २०१४ च्या जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांतच मोठ्या प्रमाणात मद्यधुंद चालक पकडण्यात आले आहेत. तब्बल ५ हजार १०१ मद्यधुंद चालकांना पकडण्यात आल्यानंतर यातील १ हजार ८५० चालकांना साध्या कैदेची शिक्षा ठोठावण्यात आली असल्याचे वाहतूक पोलिसांतील एका अधिकार्याने सांगितले. त्याचप्रमाणे १ हजार ४५७ चालकांचा परवानाही रद्द करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)