कॉक्स ॲण्ड किंग्जच्या प्रवर्तकाला ३ डिसेंबरपर्यंत कोठडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:07 IST2020-11-28T04:07:11+5:302020-11-28T04:07:11+5:30
येस बँक कथित कर्ज घोटाळा प्रकरण लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : येस बँकेत केलेल्या हजारो कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली ...

कॉक्स ॲण्ड किंग्जच्या प्रवर्तकाला ३ डिसेंबरपर्यंत कोठडी
येस बँक कथित कर्ज घोटाळा प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : येस बँकेत केलेल्या हजारो कोटींच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) गुरुवारी जागतिक टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल कंपनी असलेल्या कॉक्स आणि किंग्जचे प्रवर्तक पीटर केरकर उर्फ अजय अजित पीटर यांना रात्री उशिराने अटक केली. शुक्रवारी न्यायालयाने त्यांना ३ डिसेंबरपर्यंत ईडीची कोठडी सुनावली.
येस बँक प्रकरणी दाखल मनी लॉडरिंग प्रकरणात अधिक पुरावे गोळा करण्याच्या उद्देशाने जून महिन्यात कॉक्स ॲण्ड किंग्जच्या कार्यालयात छापेमारी करण्यात आली होती. याच प्रकरणात येस बँकेचे सहसंस्थापक राणा कपूर अटकेत असून, याबाबत पहिले आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. ही बँकेची मोठी कर्जदार कंपनी होती. या कंपनीची ३,६४२ कोटींची थकबाकी आहे.
.......................