Join us
Daily Top 2Weekly Top 5

कोविड-१९; मुंबईत तिघे निरीक्षणाखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 04:23 IST

आतापर्यंत राज्यात निरीक्षणाखाली ठेवलेल्या ८२ पैकी ८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

मुंबई : ‘कोविड -१९’ विषाणूच्या पार्श्वभूमीवर मुंबईत तीन जणांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत ७९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. आतापर्यंत राज्यात निरीक्षणाखाली ठेवलेल्या ८२ पैकी ८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.राज्यात बाधित भागातून आतापर्यंत २८८ प्रवासी आले आहेत, तर मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत ४६ हजार २१८ प्रवासी तपासण्यात आले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात ८२ जणांना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरिता निगेटिव्ह असल्याचा निर्वाळा एन.आय.व्ही., पुणे यांनी दिला आहे. आतापर्यंत भरती झालेल्या ८२ प्रवाशांपैकी ७९ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. बाधित भागातून आलेल्या २८८ प्रवाशांपैकी २०७ प्रवाशांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

टॅग्स :कोरोना