Join us
Daily Top 2Weekly Top 5

कंगना राणावतसह बहिणीला न्यायालयाने बजावले समन्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 06:55 IST

बॉलीवूड अभिनेता आदित्य पांचोली याने दाखल केलेल्या बदनामी दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत व तिची बहीण रंगोली चांडेलला मंगळवारी समन्स बजावले. पुढील सुनावणी २६ जुलै रोजी आहे.

मुंबई : बॉलीवूड अभिनेता आदित्य पांचोली याने दाखल केलेल्या बदनामी दाव्याप्रकरणी दंडाधिकारी न्यायालयाने बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत व तिची बहीण रंगोली चांडेलला मंगळवारी समन्स बजावले. पुढील सुनावणी २६ जुलै रोजी आहे.कंगना राणावत गेली कित्येक वर्षे आपल्याला बदनाम करत आहे. २०१७ मध्ये तिने एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आदित्य पांचोली, त्याची पत्नी झरीना वहाब, मुलगा सूरज पांचोली यांच्यावर टीका केली, तर कंगनाची बहीण रंगोली हिनेही टिष्ट्वटरद्वारे आदित्यवर अनेकदा टीका केली आहे. त्यामुळे आदित्य व झरीना यांनी २०१७ मध्ये अंधेरी दंडाधिकारी न्यायालयात या दोघींविरोधात बदनामीचा दावा दाखल केला. दोघींनी लेखी माफी मागावी, अशी मागणी दाव्यात केली.एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाने सांगितले की, मी या क्षेत्रात नवी असताना माझे व आदित्य पांचोलीचे प्रेमसंबंध होते. मात्र, तो खूप शिवीगाळ व मारहाण करायचा. यातून बाहेर निघण्यासाठी झरीनाची मदत मागितली असता, तिने मदत करण्यास नकार दिला.कंगनाने माझ्यासह माझी पत्नी, मुलगा, मुलीलाही या वादात ओढले आहे, ते चांगले नाही. मला माझ्या कुटुंबीयांची चिंता आहे. ती (कंगना) माझ्यावर एवढे आरोप करेल आणि मी शांत बसेन, असे होणार नाही. त्यामुळे या दोघांनी सशर्त माफी मागावी, अशी मागणी पांचोलीने केली आहे.

टॅग्स :मुंबईन्यायालय