राहुल गांधी यांना न्यायालयाचा दिलासा
By Admin | Updated: January 7, 2015 02:25 IST2015-01-07T02:25:03+5:302015-01-07T02:25:03+5:30
भिवंडी न्यायालयात हजर न राहण्याची मुभा उच्च न्यायालयाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मंगळवारी दिली़

राहुल गांधी यांना न्यायालयाचा दिलासा
मुंबई : भिवंडी न्यायालयात हजर न राहण्याची मुभा उच्च न्यायालयाने काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना मंगळवारी दिली़
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी महात्मा गांधी यांच्या मृत्यूसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक जबाबदार असल्याचे वक्तव्य केले होते़ याविरोधात संघाने भिवंडी न्यायालयात मानहानीची तक्रार केली़ राहुल गांधी हे इतिहास लपवत असून नागरिकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप संघाने तक्रारीत केला आहे़
याची दखल घेत भिवंडी न्यायालयाने राहुल गांधी यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले़ याविरोधात राहुल गांधी
यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून ही तक्रार
रद्द करण्याची मागणी केली
आहे़
न्या़ एम़ एल़ ताहिलयानी यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली़ त्यात राहुल यांना भिवंडी न्यायालयात हजर न राहण्याची मुभा द्यावी, अशी विनंती करण्यात आली़ त्यावर संघाने आक्षेप न घेतल्याने न्यायालयाने राहुल यांना याची मुभा दिली व ही सुनावणी १७ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली़
(प्रतिनिधी)