साक्षीदाराच्या फेरतपासणीची मागणी कोर्टाने फेटाळली

By Admin | Updated: January 9, 2015 02:02 IST2015-01-09T02:02:06+5:302015-01-09T02:02:06+5:30

अभिनेता सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात वाहनाची तपासणी करणाऱ्या आरटीओची फेरतपासणी घेण्याची सरकारी पक्षाची मागणी सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.

The court rejected the demand for the witness's recruitment | साक्षीदाराच्या फेरतपासणीची मागणी कोर्टाने फेटाळली

साक्षीदाराच्या फेरतपासणीची मागणी कोर्टाने फेटाळली

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणात वाहनाची तपासणी करणाऱ्या आरटीओची फेरतपासणी घेण्याची सरकारी पक्षाची मागणी सत्र न्यायालयाने गुरुवारी फेटाळली.
या प्रकरणी आर.सी. केतकर या आरटीओची नुकतीच उलटतपासणी पूर्ण झाली. मात्र केतकर यांनी उलटसुलट उत्तरे दिली असल्याने त्यांची फेरतपासणी घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनी न्यायालयाकडे केली होती.
यास सलमानचे वकील श्रीकांत शिवदे यांनी विरोध केला. केतकर यांनी उलटसुलट उत्तरे दिली
असल्यास त्याचा फटका
सलमानला बसेल. त्यामुळे
सरकारी पक्षाला याची काळजी करण्याची आवश्यकता नसल्याचे अ‍ॅड. शिवदे यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाची मागणी फेटाळली.

पुढील सुनावणीला सलमानच्या रक्ताचे नमुने घेणारे डॉक्टर व यासाठी सलमानला रुग्णालयात नेणाऱ्या पोलीस हवालदाराची साक्ष होणार आहे.

Web Title: The court rejected the demand for the witness's recruitment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.