पोलिसांसाठीही भरणार दरबार

By Admin | Updated: February 8, 2015 00:40 IST2015-02-08T00:40:30+5:302015-02-08T00:40:30+5:30

आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून त्या निकाली काढण्यासाठी दरबाराची संकल्पना अंमलात आणली आहे.

The court also filled the court for the police | पोलिसांसाठीही भरणार दरबार

पोलिसांसाठीही भरणार दरबार

नवी मुंबई : आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून त्या निकाली काढण्यासाठी दरबाराची संकल्पना अंमलात आणली आहे. आयुक्तालयात भरणाऱ्या या दरबारात पोलीस कर्मचारी आपल्या समस्या थेट वरिष्ठांपुढे मांडू शकणार आहेत. त्यानुसार गत महिन्यात पहिल्याच दरबारात प्राप्त झालेल्या १५ पैकी ५ समस्या निकाली निघाल्या आहेत.
जनतेच्या समस्या आणि तक्रारी सोडवत असताना पोलिसांचे स्वत:च्या समस्यांकडेच दुर्लक्ष होत असते. घडलेल्या गुन्'ांचा तपास, रोजच्या गुन्ह्यांची नोंद आणि त्यातून वेळ मिळाल्यास नियमित कार्यालयीन कामगार या सर्व प्रक्रियेत पोलीस कर्मचारी गुंतून गेलेला असतो. त्यामुळे जरी काही समस्या असली तर वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत मांडायची कशी असा प्रश्न त्यांना पडलेला असतो. अनेकदा पोलीस ठाण्याअंतर्गतच मिळणाऱ्या दुजाभावाच्या वागणुकीमुळे देखील त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोचता येत नाही. त्याकरिता मुख्यालय उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी दरबाराची संकल्पना अमलात आणली आहे. गत महिन्यापासून पोलिसांच्या या दरबाराला सुरुवात झाली असून प्रत्येक महिन्याला पोलीस मुख्यालयात हा दरबार भरवला जाणार आहे.
गत महिन्यात प्रथमच झालेल्या दरबारात पोलीस कर्मचाऱ्यांकडून त्यांना असलेल्या समस्या मागवण्यात आलेल्या होत्या. यावेळी उपआयुक्त पांढरे यांच्याकडे १५ निवेदने प्राप्त झाली. त्यापैकी ६ निवेदने काहीच दिवसात निकाली काढली असून इतरांची कार्यवाही सुरू असल्याचे उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना कोणाचा त्रास होतोय का?, कोणाची पदोन्नती रखडली आहे का? त्याशिवाय वेतनसंबंधीचे प्रशन, कामादरम्यानच्या समस्या अशा बाबींचा त्यात समावेश आहे.
दरबार या संकल्पनेच्या माध्यमातून थेट कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या अडचणी दूर होऊ शकतात. आपल्या पाठीशी वरिष्ठ असल्याचा आत्मविश्वास कर्मचाऱ्यांना मिळणार असल्याने हा दरबार सुरू करण्यात आल्याचे उपआयुक्त विश्वास पांढरे यांनी सांगितले. सध्या ते स्वत: हा दरबार घेत असून वेळप्रसंगी आयुक्त देखील कर्मचाऱ्यांशी संवाद साधतात. (प्रतिनिधी)

च्हा दरबार प्रत्येक महिन्याला घेतला जाणार असून त्याची सूचना काही दिवस अगोदर सर्व पोलीस ठाण्यांमध्ये दिली जाणार आहे. त्यानुसार कसलीही समस्या असणारा पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी दरबारात उपस्थित राहू शकणार आहे. तर कर्मचाऱ्यांनी मांडलेल्या समस्येवर तात्काळ तोडगा काढण्याच्या अनुषंगानेही पाऊल उचलले जाणार आहे.

च्सतत बंदोबस्त अथवा तपासात गुंतलेल्या पोलिसाला वेळप्रसंगी रजा मिळणे देखील महत्त्वाचे असते. अशा कर्मचाऱ्यांचे रजेसाठी आलेले अर्ज पूर्वी मंजुरीसाठी एकत्रित महिन्याला पाठवले जायचे. त्यामुळे एक महिनाअगोदर रजेसाठी अर्ज करावा लागायचा. परंतु या प्रक्रियेत गरोदर महिला अथवा इतर कर्मचाऱ्यांचे कौटुंबिक काम अडकून राहू नये याकरिता प्रत्येक आठवड्याला रजा मंजुरीची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचेही पांढरे यांनी सांगितले.

Web Title: The court also filled the court for the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.