Join us
Daily Top 2Weekly Top 5

टोरेस प्रकरणातील युक्रेनियन आरोपीला तुरुंगात शब्दकोश वापरण्याची कोर्टाची परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 06:15 IST

आरोप समजून घेण्यासाठी शब्दकोशाची गरज असल्याचे कोर्टाला सांगितले होते

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: टोरेस गुंतवणूक घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटकेत असलेल्या एका युक्रेनियन महिलेच्या अर्जाला विशेष न्यायालयाने मंजुरी देत तिला न्यायालयीन कोठडीत असताना इंग्रजी-रशियन भाषांतर शब्दकोश वापरण्याची परवानगी दिली. आरोपी तझागुल झासातोव्ह हिने इंग्रजी येत नसल्याचा दावा करत, करमणुकीसाठी तसेच आपल्यावरील आरोप समजून घेण्यासाठी शब्दकोशाची गरज असल्याचे कोर्टाला सांगितले होते. 

टोरेस घोटाळा मागील वर्षाच्या सुरुवातीला उघडकीस आला. विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी तिची मागणी मंजूर करताना, आरोपीला तिच्यावरील आरोपांची माहिती मिळण्याचा हक्क असल्याचे स्पष्ट केले. तिच्या अर्जाला ईडीने विरोध केला. आरोपीने भारतात बराच  काळ वास्तव्य केले असून तिला हिंदी आणि इंग्रजीची ओळख आहे, असा युक्तिवाद ईडीकडून करण्यात आला. शब्दकोश दिल्यास ती  इतर आरोपींना मदत करू शकते किंवा तपासात अडथळा निर्माण होऊ शकतो, अशी भीती ईडीने व्यक्त केली. मात्र न्या. रोटे यांनी शब्दकोश देण्यात कोणतीही हानी नाही. तिची मागणी नाकारण्यासारखा कोणताही पुरावा नाही, असे म्हटले.

English
हिंदी सारांश
Web Title : Court allows Ukrainian Torres case accused dictionary access in jail.

Web Summary : A Ukrainian woman accused in the Torres scam was granted permission by a special court to use an English-Russian dictionary while in judicial custody. She claimed she needed it to understand the charges against her. ED opposed, but the court found no harm.
टॅग्स :टोरेस घोटाळा